पनवेल : नागपंचमी संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. काही ठिकाणी जिवंत नागाची पूजा केली जाते तर काही ठिकाणी नागाच्या प्रतिमेला पुजले जाते. नागपंचमीला मोठ्या श्रद्धेने नागाची पूजा केली गेली तरी याबाबत मोठ्या अंधश्रद्धा पाळल्या जातात. याबाबत जनजागृतीसाठी ‘स्नेक अवेअरनेस अँड वाईल्डलाइफ रेस्क्यू’ या संस्थेच्या वतीने नागपंचमीनिमित्त रॅली व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. सर्पमित्र व संस्थेचे रघुनाथ जाधव यांनी यासंदर्भात पुढाकार घेऊन कार्यक्र माचे आयोजन केले. वनविभागाचे अधिकारी शिवाजी ठाकरे व पनवेल ग्रामीण रु ग्णालयाचे अधीक्षक डॉ. बी. लोहारे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी खारघर परिसरात जनजागृतीपर रॅली काढण्यात आली होती. भारती विद्यापीठ शाळेतील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. यावेळी संदेशात्मक फलक झळकावून सापाविषयी प्रचलित असलेल्या अंधश्रद्धा दूर करण्यात आल्या. सापाला ऐकू येत नाही, निसर्गाचे रक्षण सापांचे संरक्षण, साप अंडज असून सस्तन नाही, साप वाचवा पर्यावरण वाचवा, गारुडींवर बंदी घाला अशाप्रकारचे संदेश देण्यात आले. साप चावल्यास ढोंगी बाबाकडे न जाता थेट डॉक्टरकडे जावे, सापाबद्दल गैरसमज दूर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
सापांबाबत अंधश्रध्दा नव्हे श्रद्धा हवी
By admin | Updated: August 8, 2016 02:34 IST