शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

धोकादायक इमारतींच्या यादीत रेल्वे कॉलनी नाही

By admin | Updated: June 1, 2016 03:00 IST

शहरातील सर्वात धोकादायक इमारतींत जुईनगरमधील रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. वसाहत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने महापालिका त्या इमारती धोकादायक घोषित करू शकत नाही

नवी मुंबई : शहरातील सर्वात धोकादायक इमारतींत जुईनगरमधील रेल्वे वसाहतीचा समावेश आहे. वसाहत रेल्वे प्रशासनाच्या अखत्यारीत असल्याने महापालिका त्या इमारती धोकादायक घोषित करू शकत नाही. रेल्वे प्रशासन न्यायालयीन वाद सुरू असल्याचे कारण देत याकडे दुर्लक्ष करीत असून, त्यामुळे रेल्वेचे कर्मचारी व त्यांचा परिवार जीव मुठीत घेऊन जगत आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई महानगरपालिकेने शहरातील १८७ धोकादायक इमारतींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये जुईनगर सेक्टर २२ मधील रेल्वे कॉलनीचा समावेश नाही. रेल्वे वसाहतीमध्ये जवळपास ६० इमारती आहेत. यामधील ३५ इमारतींमध्ये कामगार व अधिकारी परिवारासह वास्तव्य करीत आहेत. अनेक इमारती अर्धवट बांधकाम झालेल्या स्थितीमध्ये आहेत. पूर्णपणे मोडकळीस आल्याने काही इमारती खाली केल्या आहेत. वापर सुरू असलेल्या इमारतींची स्थितीही बिकट आहे. कोणत्याही क्षणी इमारत कोसळून शेकडो नागरिकांचा जीव जाण्याची शक्यता आहे. यानंतरही महापालिकेने या इमारती धोकादायक घोषित का केल्या नाहीत? रेल्वे वसाहत ही रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीत आहे. तेथील नियोजनाचा अधिकारही रेल्वे प्रशासनाचा आहे. यामुळे इमारती धोकादायक घोषित करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. परंतु प्रत्यक्षात रेल्वे प्रशासन या वसाहतीकडे दुर्लक्ष करीत आहे. रेल्वे वसाहत बांधकाम सुरू असल्यापासून वादग्रस्त ठरली आहे. इमारती बांधणाऱ्या ठेकेदाराविषयी झालेल्या मतभेदानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले आहे. अनेक इमारतींचे बांधकाम अर्धवट ठेवावे लागले आहे. न्यायप्रविष्ठ बाब असल्याने रेल्वे धोकादायक इमारतींची पुनर्बांधणी करीत नाही. मोडकळीस आलेल्या इमारती पाडतही नाही. किरकोळ दुरुस्ती करून त्यांचा वापर सुरू आहे. पावसाळ्यात ड्युटीवर गेलेल्या कामगारांना घरी जाईपर्यंत आपले कुटुंब सुरक्षित असेल का, याची चिंता सतावत असते. स्थानिक नगरसेविका रूपाली भगत व ठाणे जिल्हा युवक काँगे्रसचे अध्यक्ष निशांत भगत यांनी येथील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी वारंवार रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला, परंतु प्रशासन ठोस निर्णय घेत नाही. यामुळे इमारत कोसळून मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न रहिवाशी विचारू लागले आहेत.