शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यात एकही बोगस डॉक्टर नाही

By admin | Updated: June 19, 2017 05:10 IST

बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हे त्यामागचे एक कारण आहे.

मयूर तांबडे। लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : बोगस डॉक्टरांविरोधात कठोर कारवाई करण्याची सूचना सरकारकडून देण्यात आली आहे. स्त्रीभ्रूण हत्या रोखणे हे त्यामागचे एक कारण आहे. पनवेल तालुक्यातही बोगस डॉक्टरांविरोधात मोहीम राबविण्यात आली. आश्चर्य म्हणजे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना या मोहिमेत एकही बोगस डॉक्टर आढळला नाही. वर्षभरापूर्वी करण्यात आलेल्या सर्व्हेत नवी मुंबई आणि पनवेल परिसरात शेकडोंच्या वर बोगस डॉक्टर असल्याचे उघड झाले होते आणि आता एकही बोगस डॉक्टर न आढळल्याने मोहिमेवरच संशय व्यक्त होत आहे. तालुक्यात बोगस डॉक्टर शोधमोहीम शासनाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली होती. जवळपास ३० दिवस ही मोहीम तालुक्यात राबविण्यात आली. मोहिमेमुळे बोगस डॉक्टरांचे नावे उघड करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, या शोधमोहिमेत पनवेल तालुक्यातील एकही बोगस डॉक्टर सापडला नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बोगस डॉक्टर शोधमोहीम शासकीय निकषांनुसार सुरू असून, या पथकाकडून ग्रामीण भागातील शेकडो डॉक्टरांची तपासणी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तालुक्यात शेकडो बोगस डॉक्टरांनी बस्तान मांडले आहे, असे असतानादेखील मोहिमेत तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना एकाही बोगस डॉक्टरावर कारवाई करता आलेली नाही. स्त्रीभृणहत्त्या रोखण्याचा एक भाग म्हणून बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई अधिक कठोर करणे आवश्यक आहे. मात्र, पनवेल तालुक्यातील ही मोहीम केवळ फार्सच ठरू लागली असल्याचे दिसत आहे. पनवेलमध्ये बोगस डॉक्टर काम करत असल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, हे तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना का दिसत नाही? असा सवाल उपस्थित झाला आहे. याबाबत तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र इटकरे यांच्याशी संपर्क साधला असता, एकही बोगस डॉक्टर सापडला नसल्याची माहिती दिली.