शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत १५ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2023 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : पावसाळ्यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १५ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांची आयुक्त राजेश ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पावसाळ्यामध्ये महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये १५ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांची आयुक्त राजेश नार्वेकर यांनी पाहणी केली. सुरक्षेसाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात यावी व सुरक्षेसाठी नागरिकांना स्थलांतर करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत. शहर आपत्ती व्यवस्थापन समितीने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. सर्व शासकीय व निमशासकीय संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनाही पावसाळ्यापूर्वी कामे वेळेत करण्याच्या सूचना केल्या आहेत. शहरातील धोकादायक ठिकाणांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, १५ ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली. 

मलनिस्सारण वाहिन्यांची सफाई    एमआयडीसीमधील रमेश मेटल कॉरी परिसराची पाहणी केली. येथील नागरिकांचे योग्य ठिकाणी स्थलांतर करण्यात यावे. इतर ठिकाणीही पाहणी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशा सूचनाही केल्या आहेत. संभाव्य धोका लक्षात घेऊन नैसर्गिक नाल्यांच्या प्रवाहात असलेल्या झोपड्या हटविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.    नैसर्गिक नालेसफाई, बंदिस्त गटारे, मलनिस्सारण वाहिन्यांच्या सफाई कामांचीही प्रत्यक्षात पाहणी केली. शहरात पाणी तुंबणार नाही, नैसर्गिक नाल्यामध्ये अडथळे निर्माण होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही करण्यात आल्या. या पाहणी दौऱ्याच्या वेळी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, शहर अभियंता संजय देसाई, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त बाबासाहेब राजळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.