शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाविषयी शासनासह मनपाच्या आकड्यांमध्ये दिसते आहे तफावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:53 IST

लोकप्रतिनिधींची तक्रार : आकडेवारीविषयी संभ्रम दूर करण्याची मागणी

नवी मुंबई : कोरोनाविषयी महानगरपालिका व शासनाच्या आकडेवारीमध्ये फरक असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत असून आकड्यांचा घोळ मिटवावा, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मनपा आयुक्तांकडे केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिका प्रतिदिन कोरोनाविषयी दैनंदिन अहवाल प्रसिद्ध करीत असते. यामध्ये रोज वाढलेले रुग्ण, बरे झालेले रुग्ण, मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा याविषयी तपशील दिला जातो. जिल्हा अधिकारी कार्यालयाकडूनही नियमित अहवाल प्रसिद्ध केला जातो. याशिवाय राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून प्रतिदिन राज्यातील आकडेवारी प्रसिद्ध केली जाते. महानगरपालिका देत असलेले आकडे व शासनाकडील अहवाल यामध्ये तफावत येऊ लागली आहे. माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना पत्र देऊन हा प्रकार निदर्शनास आणून दिला आहे.

बुधवारी मनपाने २८७ रुग्ण वाढल्याचे त्यांच्या अहवाल नमूद केले होते. परंतु शासनाच्या अहवालात ५१९ रुग्ण वाढल्याचे नमूद केले होते. शासनाने एकूण रुग्णसंख्या २६,७४९ दिली असून, मनपाने हा आकडा २४,२१४ दिला आहे. दिवसभरात २ जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृत्यू झालेल्यांचा आकडा ६०२ असल्याचे शासनाच्या अहवालात नमूद केले आहे. मनपाने मात्र ६ जणांचा मृत्यू झाल्याचे व एकूण मृतांचा आकडा ५५७ असल्याचे नमूद केले आहे. महानगरपालिका व शासनाकडील आकडेवारीमधील फरकामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. नक्की कोणाची आकडेवारी खरी असा प्रश्न निर्माण होत आहे. आकडेवारीमधील घोळ लवकरात लवकर दूर करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.महानगरपालिका व शासनाकडील आकडेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे. मनपाच्या अहवालापेक्षा शासनाकडील अहवालात रुग्णसंख्या व मृतांचा आकडा जास्त असल्याचे निदर्शनास आले असून हा प्रकार आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिला आहे. - वैभव गायकवाड, माजी नगरसेवक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNavi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका