शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जखमा बांधण्यासाठी मलमपट्ट्याही नाहीत, मेडिकलमधील साहित्याची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2018 03:03 IST

महापालिका रुग्णालयामध्ये औषधे व अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा कायम आहे. मंगळवारी रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधून हातमोजे व जखमा बांधण्यासाठी बँडेज आणण्याची सक्ती केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.

नवी मुंबई : महापालिका रुग्णालयामध्ये औषधे व अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा कायम आहे. मंगळवारी रुग्णांच्या नातेवाइकांना मेडिकलमधून हातमोजे व जखमा बांधण्यासाठी बँडेज आणण्याची सक्ती केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे.इंदिरानगर परिसरातील दोन रुग्णांना मंगळवारी उपचारासाठी महापालिका रुग्णालयात नेण्यात आले होते. दोघांच्याही डोक्याला जखमा झाल्या होत्या. वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णांच्या जखमा पुसण्यासाठी व मलमपट्टी करण्यासाठीचे साहित्यही नसल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांनी तत्काळ हातमोजे व बँडेजचे साहित्य मेडिकलमधून विकत आणण्यास सांगितले. रुग्णांच्या नातेवाइकांना जवळपास ७०० रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागला. रुग्णालयामध्ये साहित्य नसल्याने बाहेरून आणण्याची सक्ती करण्यात आली. नातेवाइकांनी मेडिकलमधून पक्के बिल मागितले. बिल घेतले असल्याचे लक्षात येताच, पालिका कर्मचाऱ्यांनी बिल मागून घेण्याचा प्रयत्न केला. यापूर्वीही महापालिका रुग्णालयात जखमींना मेडिकलमध्ये जाऊन हातमोजे विकत आणण्यास भाग पाडले होते. पुन्हा तोच प्रकार घडल्यामुळे रुग्ण व नातेवाइकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.>महापालिका रुग्णालयात गरीब रुग्णांची लूट केली जात आहे. रुग्णालयात साहित्याची कमतरता आहे. मेडिकलचालकाच्या फायद्यासाठीही रुग्णांना मेडिकलमधून साहित्य आणण्याची सक्ती केली जात असून, याविषयी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहे.- महेश कोठीवाले,शाखाप्रमुख,शिवसेना