शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

चोरी करणाऱ्या दुकलीला अटक

By admin | Updated: April 24, 2017 02:37 IST

बंद कंपनीत चोरी करणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही महापे गावचे राहणारे असून त्यांच्याकडून

नवी मुंबई : बंद कंपनीत चोरी करणाऱ्या दोघांना तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही महापे गावचे राहणारे असून त्यांच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यांनी बँकेने सील ठोकल्याने बंद असलेल्या कंपनीच्या मागच्या बाजूचे शटर तोडून त्याठिकाणी चोरी केली होती.व्यंकटेश नाडर (१९) व आकाश चव्हाण (२०) अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी पाच महिन्यांपूर्वी महापे येथील ई इन्फोटेक इंडिया कंपनीत चोरी केली होती. आर्थिक प्रकरणातून बँकेने या कंपनीला सील ठोकल्याने ही कंपनी बंद होती. याचा गैरफायदा घेत नाडर व चव्हाण यांनी कंपनीच्या मागच्या बाजूचे शटर तोडून आत प्रवेश केला होता. त्यानंतर कंपनीतले ९ एलसीडी मॉनिटर व १ प्रिंटर चोरी करून नेला होता. मात्र कंपनी बंद असल्याने अद्यापपर्यंत या प्रकरणाचा उलगडा होवू शकलेला नव्हता. काही दिवसांपूर्वी एक जण चोरीचे मॉनिटर विकण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती तुर्भे एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रामचंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक उल्हास कदम, हवालदार दिगंबर झांजे, सागर रसाळ, सोमनाथ वने, पोलीस नाईक युवराज राऊत, सूरज जाधव, योगेश ठाकूर वस्वप्निल अहिरे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांनी सापळा लावून एकाला ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी ई इन्फोटेक इंडिया या बंद कंपनीतून १३ मॉनिटर व १ प्रिंटर चोरल्याची कबुली दिली. त्यापैकी ९ मॉनिटर जप्त करण्यात आले असून उर्वरित मॉनिटर त्यांनी कोणाला विकले याचा अधिक तपास सुरू असल्याचे उल्हास कदम यांनी सांगितले. (प्रतिनिधी)