शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

खारघर शहरातील नंदिनी गोशाळेतून चार जनावरांची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 01:16 IST

पाच महिन्यांतील दुसरी घटना: एक गाय बेशुद्ध पडल्याने नेता न आल्याने राहिली; पोलिसात तक्रार दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : खारघर शहरातील सेक्टर-१ रेल्वेस्थानकाच्या मागच्या बाजूस असलेल्या नंदिनी गोशाळेत रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात सहा ते सात चोरट्यांनी येथील कर्मचाऱ्यांना धमकावून दोन गायी व दोन बैल अशा चार गुरांना गुंगूचे औषध देऊन चोरून नेली.टेम्पोच्या साहाय्याने सहा ते सात जणांनी चार गुरांसह पोबारा केला .विशेष म्हणजे या घटनेत आणखी गायीला गुंगीचे औषध देऊन चोरण्याचा प्रयत्न केला मात्र ही गाय गरोदर असल्याने गोशाळेत बेशुद्ध अवस्थेत पडल्याने तिला या चोरट्यांना घेऊन जाता आले नाही. या गायीची अवस्था गंभीर असून तिच्यावर पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उपचार सुरू आहेत. यासंदर्भात गोशाळेचे मालक शैलेश खोतकर यांनी खारघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केली आहे. विशेष म्हणजे सध्याच्या घडीला लॉकडाऊन सुरू आहे. ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असूनदेखील अशाप्रकारे रात्री-अपरात्री चोरीच्या घटना कशा काय होतात याबाबत शैलेश खोतकर यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात अशीच घटना घडली होती. त्या घटनेचादेखील कोणताच छडा लागला नसल्याचे खोतकर यांनी सांगितले.

चोरांवर पोलिसांचा अंकुश नाही?खारघर शहरात वाहने, दागिने चोरीच्या घटना वारंवार घडत आहेत. त्यानंतर थेट गायींची चोरींची घटना घडल्याने शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरांनी शहरात धुमाकूळ घातला असताना पोलिसांचे चोरट्यांवर अंकुश नाही का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.