शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तरुणीने धाडसाने सोनसाखळी चोराला पकडले; दुचाकीवरून खेचून खाली पाडले

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 4, 2023 16:49 IST

आर्ची हिने प्रसंग सावधानता दाखवत चैन खेचणाऱ्याच्या हाताला धरून खेचले असता तो खाली पडला.

नवी मुंबई - तरुणीच्या धाडसामुळे सोनसाखळी खेचुन पळणारा चोरट्या हाती लागला आहे. सोनसाखळी खेचून दोघेजण मोटरसायकलवरून पळत असताना तरुणीने एकाला मोटारसायकलवरून खाली खेचले. यादरम्यान त्यांच्यात झटापट सुरु असताना नागरिकांनी तिच्या मदतीला धाव घेतली. याप्रकरणी एपीएमसी पोलिस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कोपरी येथे सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. परिसरात राहणारी आर्ची वैश्य (२०) हि बहिणीला मोबाईल खरेदीसाठी चालली होती. यावेळी समोरून मोटरसायकलवर आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने तिच्या गळ्यातली सोनसाखळी खेचली. त्यामुळे आर्ची हिने प्रसंग सावधानता दाखवत चैन खेचणाऱ्याच्या हाताला धरून खेचले असता तो खाली पडला. त्यानंतर चोरट्याने तिच्यासोबत झटापट करून पळून जाण्याचा देखील प्रयत्न केला. परंतु आर्चीने धाडसाने त्याच्याशी सामना केला असता हा प्रकार पाहून त्या मार्गाने जाणाऱ्या चिंतामण पवार यांनी तिच्या मदतीला धाव घेऊन चोरट्याला पकडले.

यावेळी त्याचा साथीदार मात्र घटनास्थळावरून पळून गेला. हाती लागलेल्या चोरट्याला नागरिकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले असता त्याचे नाव सिद्धार्थ मौर्या (२७) असून त्याच्या पळालेल्या साथीदाराचे नाव रोहित तुपे असल्याचे समोर आले. दोघेही कोपर खैरणेचे राहणारे असून त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत आर्ची हिच्या गळ्याला जखम झाली असतानाही तिने धाडसाने गुन्हेगारांशी चार हात करून एकाला पकडून दिले आहे. त्यामुळे तिच्या धाडसाचे कौतुक पोलिसांनी देखील केले आहे.