शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या प्रकल्पांची प्रतीक्षा संपणार, नव्या वर्षात उद्घाटनाला मुहूर्त; भूमिपुत्र भवन, जलवाहतूक होणार सुरू

By कमलाकर कांबळे | Updated: January 16, 2024 12:41 IST

नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे हक्क आणि त्यांच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी सिडकोने उलवे येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून भूमिपुत्र भवन बांधले आहे.

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. फेब्रुवारी-मार्च महिन्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे रखडलेल्या विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाला आता तरी मुहूर्त मिळेल, अशी अपेक्षा जनतेकडून व्यक्त होत आहे.

विशेषतः शिवडी-न्हावाशेवा अटल सेतू, खारकोपर-उरण रेल्वे आणि दिघा रेल्वेस्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाल्यानंतर नवी मुंबईकरांना आता काही प्रकल्पांच्या उद्घाटनाचे वेध लागले आहेत. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांचे हक्क आणि त्यांच्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी सिडकोने उलवे येथे सुमारे २८ कोटी रुपये खर्च करून भूमिपुत्र भवन बांधले आहे.

मागील दोन वर्षांपासून तयार असलेल्या या प्रकल्पाचे आचारसंहिता लागू होण्याअगोदर उद्घाटन होईल, असे आडाखे बांधले जात आहेत.  मुंबई ते नवी मुंबईदरम्यान जलवाहतूक सेवा सुरू करण्यासाठी सिडकोने नेरूळ येथे १११ कोटी रुपये खर्च करून उभारलेल्या जेट्टीच्या उद्घाटनाची नवी मुंबईकरांना प्रतीक्षा असून, त्यादृष्टीनेसुद्धा सिडकोने कार्यवाही सुरू केली आहे.

घरांच्या सोडतीला मिळणार मुहूर्त?सिडकोच्या माध्यमातून मागील वर्षभरात सिडकोने घरांची एकही योजना जाहीर केलेली नाही. त्यामुळे नवीन सोडतीकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे. पुढील चार वर्षांत सिडको ६७ हजार घरांची उभारणी करणार आहे. सध्या पंचवीस हजार घरांचे बांधकाम सुरू आहे. मात्र मार्केटिंग आणि विक्रीसाठी  खासगी सल्लागार संस्थेच्या नियुक्तीनंतर निर्माण झालेल्या वादामुळे सिडकोला मागील वर्षभरात घरांची एकही नवीन योजना जाहीर करता आलेली नाही. प्रजासत्ताकदिनी अर्थात २६ जानेवारीला सिडकोकडून घरांची सोडत काढली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच होणार उद्घाटन    ही सेवा चालविण्यासाठी  कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. त्यासाठी सिडकोने निविदा मागविल्या होत्या.     ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याने हा प्रकल्पसुद्धा फेब्रुवारीपूर्वी कार्यान्वित होईल, अशी शक्यता आहे.    सायन-पनवेल महामार्गावरील सानपाडा आणि तुर्भेदरम्यानची कोंडी फोडण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने तुर्भे येथे उड्डाणपूल बांधला आहे.     लोकांची गैरसोय टाळण्यासाठी संबंधित विभागाने उद्घाटनापूर्वीच तो वाहतुकीसाठी खुला केला आहे.     आचारसंहिता लागू होण्याअगोदर त्या उड्डाणपुलाचे औपचारिक उद्घाटन केले जाण्याची शक्यता आहे. 

दक्षिण नवी मुंबईत अनेक प्रकल्पया शिवाय सिडकोच्या माध्यमातून दक्षिण नवी मुंबईत अनेक लहान-मोठे विकास प्रकल्प पूर्ण करण्यात आले आहेत. त्यांचेही लवकरच लोकार्पण होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई