शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत

By अतुल कुलकर्णी | Updated: December 18, 2025 07:12 IST

जेएनपीए बंदरातून कृषी माल देशभर पोहोचविणे आता अधिक सोपे

'एनएमआयए'चे फायदे/अपेक्षा : भाग ४

अतुल कुलकर्णी लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : जगभरातून मुंबईविमानतळावर २५ विमान कंपन्या मालवाहतूक करतात. त्यांची सगळी विमाने मुंबईत येतात. आपल्याकडे वर्षाला पाच लाख मेट्रिक टन सामानाची आयात-निर्यात होते. त्यात दर महिन्याला अंदाजे १७ हजार मेट्रिक टन सामानाची निर्यात, तर २३ हजार मेट्रिक टन सामानाची आयात होते. या सगळ्याचा परिणाम वाहतूक कोंडीवरही होतो. मोठ्या प्रमाणावर कार्गो वाहतूक नव्या मुंबईत नेली तर नवी मुंबईतून त्यांना अन्य राज्यात जाणे सोपे होईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. तसेच त्या सगळ्या वेळा महाराष्ट्रातल्या प्रमुख शहरातून मुंबईला येऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध होऊ शकतात.

मुंबई विमानतळाने २४ तासांत १०३६ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. यावर बोलताना कौन्सिल ऑफ इंडियन एव्हिएशनचे अध्यक्ष नितीन जाधव म्हणाले, मुंबई विमानतळावर २४ तासांत अंदाजे ९५० विमाने येतात. त्यातली २५ कार्गो विमाने आहेत, तर जवळपास २५ विमाने प्रवासी आणि कार्गो दोन्हीची ने-आण करतात. (काही वर्षांपूर्वी मुंबई विमानतळावरून ७० कार्गो विमानांचे रोज येणे-जाणे झाले होते.) त्याशिवाय सध्या किमान २५ खासगी विमाने रोज मुंबईत ये-जा करतात. याचा अर्थ २५ कार्गो विमानांचे येणे-जाणे जर नवी मुंबई विमानतळावरून झाले तर तेवढ्या वेळा मुंबई विमानतळावर सहज उपलब्ध होतील, असाही तर्क जाधव यांनी दिला. याबाबत मुंबई विमानतळ प्रशासनाशी सातत्याने संपर्क साधूनही नेमकी किती कार्गो विमानांची वाहतूक होते, ती माहिती मिळू शकली नाही.

सध्याच्या स्थितीत मुंबई विमानतळावर क्रॉस रन-वेमुळे कार्गो विमानाच्या हाताळणीस मर्यादा आहेत. मुंबई विमानतळावर दोन रनवे असले तरी ते क्रॉस रनवे आहेत. त्यामुळे एकावेळी एकच विमान येऊ किंवा जाऊ शकते. असे असतानाही मुंबई विमानतळाने २४ तासांत जास्तीत जास्त म्हणजे १०३३ विमानांची वाहतूक करण्याचा विक्रम केला आहे. दिल्लीला सरळ रेषेत चार रन-वे असूनही तिथे २४ तासांत १५०० विमानांची वाहतूक झाली आहे. आता नवी मुंबई विमानतळामुळे कार्गोसाठी जास्तीच्या वेळा उपलब्ध होऊ शकतात. शेतमालाला तसेच फार्मा इंडस्ट्रीसाठी याचा फायदा होऊ शकतो. शिवाय मुंबईतील कार्यों वाहतूक मोठचा प्रमाणावर नवी मुंबईत शिफ्ट केली आणि तेवढ्या वेळा अन्य प्रवासी विमानांसाठी मुंबईत उपलब्ध करून दिल्या तर त्याचा मोठा फायदा दोन्ही बाजूने होऊ शकतो.

नवी मुंबई विमानतळावरून होणाऱ्या कार्गो वाहतुकीचा फायदा पुणे, नाशिक, रायगड या जिल्ह्यांना तसेच ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहत तसेच पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भाग होणार आहे. नवी मुंबईत एपीएमसीची वर्षाला १० ते १२ हजार कोर्टीची उलाढाल आहे. १०० कोर्टीचा महसूल सरकारला मिळत आहे. 'एनएमआयए 'वरून कार्गो वाहतूक सुरू झाली तर आंबे, द्राक्ष आणि कांदा यांना सगळ्यात मोठा फायदा होईल होऊ शकतो. या विमानतळापासून जेएनपीए बंदर जवळच आहे त्यामुळे तेथील मालाचीदेखील विमानतळावरून देशभरात पोहोचवणे सोपे होणार आहे. या विमानतळामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. त्यांची आर्थिक सक्षमता वाढेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला होता. 

कार्गो वाहतूक करणाऱ्या विमान कंपन्या

ब्लू डार्ट, एरो लॉजिक, चॅलेंज एअर कार्गो, सिल्क वे वेस्ट एअरलाइन्स, एअर फ्रान्स, चायना एअरलाइन्स, कॅथे पॅसिफिक, इथिओपियन एअरलाइन्स, फेडएक्स, लुफ्थान्सा, कतार एअरवेज, सिंगापूर एअरलाइन्स, टर्किश एअरलाइन्स, ओमान एअर, मलेशिया एअरलाइन्स, एअर मॉरिशस, एअर टांझानिया, इंडिगो कार्गो, केनिया एअरवेज, यूपीएस, केएलएम, एमिरेट्स, सौदिया एअरलाइन्स, एतिहाद.

English
हिंदी सारांश
Web Title : Cargo transport from Navi Mumbai benefits state, eases congestion.

Web Summary : Shifting cargo operations to Navi Mumbai airport benefits Maharashtra by easing Mumbai's congestion. The move aids farmers, industries, and boosts revenue. The airport will benefit from increased slots for passenger flights. Key companies like Blue Dart and Emirates use the airport.
टॅग्स :AirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबईMumbaiमुंबई