शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

नियमांचे पालन करा, अन्न व औषध प्रशासनाची औषधी विक्रेत्यांना तंबी

By योगेश पिंगळे | Updated: August 23, 2023 19:48 IST

नियमांचे पालन करण्याच्या सूचना

नवी मुंबई : रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयाशी संलग्न मेडिकल दुकानातून औषधी खरेदीसाठी सक्ती न करण्याचे तसेच याबाबत मेडिकलच्या दर्शनी भागात फलक बसविण्याचे आदेश अन्न व औषध प्रशासनाने परीपत्रकाच्या माध्यमातून यापूर्वीच दिले आहेत. परंतु शहरात या नियमांची अंमलबजावणी होत नसल्याचे वृत्त 'लोकमत' ने प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त रोहित राठोड यांनी शहरातील रुग्णालय संलग्न मेडिकल दुकानदारांना कारवाईचे संकेत दिले होते. तसेच याबाबत मंगळवारी रुग्णालयातील मेडिकल दुकानचालकांची बैठक घेत नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या.                रुग्णालयात दाखल असणाऱ्या रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी त्या रुग्णालयाशी संलग्न असलेल्या मेडिकल दुकानातून घेण्याची सक्ती केली जाते. अन्न व औषध प्रशासनाने काही महिन्यांपूर्वी पारिपत्रक काढून औषधी खरेदीसाठी रुग्णांना सक्ती न करण्याचे तसेच रुग्णालयाशी संलग्न मेडिकल दुकानाच्या दर्शनी भागात याबाबतचे फलक बसविण्याच्या सूचना केल्या होत्या. प्रत्यक्षात या नियमांची अंमलबजावणी होते का? हे पाहण्यासाठी लोकमत ने रियालिटी चेक केले होते. मात्र काही रुग्णालयातील मेडिकल दुकानात कोणतेही फलक बसविण्यात आले नसल्याचे तसेच रुग्णांना औषधी खरेदीसाठी सक्ती केली जात असल्याचे 'लोकमत' च्या रियालिटी चेकमध्ये आढळून आले होते. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर अन्न व औषध प्रशासनाचे उपआयुक्त राठोड यांनी शहरातील रुग्णालय संलग्न मेडिकल दुकानचालकांना कारवाईचे संकेत दिले होते. घटनेतील गांभीर्य लक्षात घेत त्यांनी मंगळवारी सानपाडा येथील केमिस्ट भवन येथे बैठक घेतली यावेळी नियमांचे पालन करण्याच्या सूचना केल्या. यावेळी प्रशासनाचे अधिकारी, नवी मुंबई केमिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, सदस्य आणि नवी मुंबईतील रुग्णालय संलग्न मेडिकलचालक उपस्थित होते.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागmedicineऔषधं