शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळामुळे नवी मुंबई देशात नंबर १ होईल, १ लाख रोजगारही मिळतील; मंगलप्रभात लोढा यांचा विश्वास

By नामदेव मोरे | Updated: January 16, 2024 16:23 IST

४ लाख नागरिकांना अप्रत्यक्ष रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : देशात सर्वाधीक स्टार्टअप महाराष्ट्रात आहेत. नवी मुंबई विमानतळामुळे या परिसरात थेट १ लाख नागरिकांना व ४ जणांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळणार आहे. स्टार्टअपमध्येही नवी मुंबईला देशात नंबर १ होण्याची संधी असल्याचा विश्वास कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला आहे.

नवी मुंबई अंतरराष्ट्रीय विमानतळामुळे निर्माण होणाऱ्या विकासाच्या संधी या विषयावर वाशी मधील सिडको सभागृहात आकांक्षा की उडान परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी तरूणांनी स्वत:चा व्यवसाय उभारण्यास प्राधान्य द्यावे. नोकरी देणारे तरूण तयार झाले पाहिजेत असे मत केले. देशात स्टार्टअप इंडियाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्राचा यामध्ये पहिला क्रमांक आहे. नवी मुंबई विमानतळामुळे या परिसरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. या संधीचा तरूणांनी लाभ घ्यावा व स्वत:चा स्टार्टअप सुरू करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. अदाणी एनएमआयएएल चे सीईओ बीव्हीजेके शर्मा यांनी विमानतळामुळे नवी मुंबई, पनवेल, उरण परिसराचा विकास झपाट्याने होणार असल्याचे मत व्यक्त केले.

    एनएमआयएएल चे चारूदत्त देशमुख यांनी यांनी विमानतळामुळे हाॅटेल, लॉजीस्टीक, कार्गोपार्क, बांधकाम व्यवसायाला गती मिळणार आहे. डिसेंबर अखेर पहिल्या टप्याचे बांधकाम पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला. माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी यांनी परिषदेच्या आयोजनाचा उद्देश स्पष्ट केला. यावेळी आमदार गणेश नाईक, मंदा म्हात्रे यांनीही त्यांची भुमीका स्पष्ट केली. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये माजी आमदार संदीप नाईक, निलेश म्हात्रे, सतीश निकम यांनी महत्वाची भुमीका बजावली. केंद्रीय राज्य मंत्री जनरल व्ही के सींग यांनी ऑनलाईन भाषणाद्वारे या उपक्रमाचे स्वागत केले.

विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नावपरिषदेमध्ये व्यासपिठावर प्रकल्पग्रस्तांचे नेते दि बा पाटील यांची प्रतीमा ठेवण्यात आली होती. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा सर्व प्रकल्पग्रस्तांचा आग्रह असून तो लवकरच पूर्ण होईल असे सांगितले. आमदार गणेश नाईक यांनीही दि. बा. पाटील यांच्या नावाचा प्रस्ताव केंद्राकडे गेला असून त्यावर लवकरच शिक्कामोर्तब होईल असा विश्वास व्यक्त केला. पहिल्या विमानउड्डाणामध्ये लोकनेते दि बा पाटील विमानतळावर आपले स्वागत हे शब्द ऐकण्यास मिळतील असा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Airportविमानतळ