शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

फावल्या वेळेत इंस्टाचे व्यसन नडले ....रिल्स बनविणारे पाच कर्मचाऱ्यांचे निलंबन! 

By वैभव गायकर | Updated: January 27, 2024 13:57 IST

पनवेल महामहापालिकेत गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपनीकडून मनुष्यबळ पुरविले जाते.

पनवेल: पनवेल महानगरपालिकेत कर्तव्यावर असताना फावल्या वेळेत इंस्टा व्हिडीओ बनविणे सहा कर्मचाऱ्यांना चांगलेच भोवले आहे. कार्यालयीन वेळेत इन्स्टाग्रामवर अभिनयाचे व्हिडिओ बनवून सोशल मिडीयावर प्रसिद्ध करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या पाच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे आयुक्त गणेश देशमुख यांनी निलंबन करून कार्यालयीन वेळेत गैरव्यवहार खपवून घेतला जाणार नसल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी कारवाईच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.     पनवेल महामहापालिकेत गुरूजी इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंत्राट कंपनीकडून मनुष्यबळ पुरविले जाते. या कंत्राटदारामार्फत भरती केलेल्या कर्मचाऱ्यांचे इन्स्टावर अनेक व्हिडीओ झपाट्याने व्हायरल झाले. यामध्ये एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचे देखील समावेश आहे. व्हायरल होत असलेले व्हिडिओ पालिका आयुक्त गणेश देशमुख यांना देखील प्राप्त झाले. 

याबाबत तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश आस्थापना विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांना दिले. त्यानुसार रिल्समध्ये सहभाग असलेला महेंद्र ठाकूर, आश्विनी नानासो हजारे, सुनिता सुजित नाईक, सुलोचना गडहिरे, अमर नाईक हे पाच कंत्राटी कामगार डेटा इन्ट्री ऑपरेटर आहेत. तसेच महापालिकेत कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून लिपिक पदावर काम करणारे आकाश केणी यांचा सहभाग होता. कंत्राटी कामगारांचे थेट निलंबन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून लिपिक आकाश केणी याला कायदेशीर प्रक्रिया पुर्ण करीत कारणे दाखवा नोटीस दिली आहे. 

कर्मचाऱ्यांचे गैरवर्तणूक खपवून घेतला जाणार नाही.कर्मचाऱ्यांनी नियमात आणि शिस्तीत काम केलेच पाहिजे.अशाप्रकारे व्हिडीओ बनवून प्रसारित करणे म्हणजे पालिका प्रशासनाच्या कामकाजावर गालबोट लावण्याचा प्रयत्न आहे.यामुळे तत्काळ या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.- गणेश देशमुख (आयुक्त,पनवेल महानगरपालिका)

टॅग्स :panvelपनवेल