ठाणो : काही दिवसांपासून ठाण्यात डोळ्यांच्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाल्याने ठाणोकर हैराण झाले आहेत. हवामानात झालेल्या बदलामुळे डोळ्यांची साथ फैलावत असल्याचे मत महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केले आहे. नागरिकांनी योग्य काळजी आणि वेळेवर उपचार घेणो आवश्यक आहे.
काही दिवसांपासून शहरात डोळ्यांच्या साथीचे प्रमाण वाढले आहे. डोळे आल्यानंतर वेळीच उपचार घेतले तर डोळे लवकर बरे
होऊ शकतात, अशी माहिती
आरोग्य विभागाने दिली आहे. महापौर संजय मोरे यांनी डोळ्यांच्या आजाराबाबत जनजागृती करावी, या आजाराचा फैलाव होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच ठोस उपाययोजना करावी, असे आवाहनही केले आहे. झोपडपट्टीत साथ वेगाने पसरत आहे. 25 आरोग्य केंद्रांमध्येही सध्या नेत्रविकारांचे रुग्ण वाढले आहेत. रोज प्रत्येक केंद्रामध्ये 5क्-6क् रुग्ण दाखल होत आहेत. (प्रतिनिधी)