ठाणो : निवडणूक जाहीर झाल्यानंतर आदर्श आचारसंहिता भंग होऊ नये म्हणून राजकीय पक्षांनी सभा किंवा बॅनर लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेणो बंधनकारक आहे. अशा प्रकारे परवानगी न घेता सभा घेणो, पोस्टर व ङोंडे लावणो, सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी आचारसंहिता भंगाचे 1क् गुन्हे पोलीस ठाण्यांत दाखल करण्यात आले आहेत. टोल फ्री नंबरवर एकूण 392 तक्रारी आल्या असून त्याही निकाली काढल्याची माहिती सूत्रंनी दिली.
निवडणूक काळात कुठलाही गैरप्रकार होऊ नये म्हणून निवडणूक आयोग व पोलिसांकडून काळजी घेतली जात आहे. याचदरम्यान, सभा, रॅली, लाऊडस्पीकर, निवडणुकीत वापरण्यात येणा:या वाहनाची परवानगी आदी परवानग्या घेण्यासाठी जिल्ह्यात 18 सहायक निवडणूक निर्णय अधिका:यांच्या स्तरावर एक खिडकी योजना कार्यान्वित केली आहे. (प्रतिनिधी)
असे आहेत गुन्ह़े़़
विनापरवाना सभा घेण्यासंदर्भात 2, विनापरवाना पोस्टर व ङोंडे लावण्याचे 4, कार्यक्र माचे आयोजन केल्याचे 3 आणि सरकारी कामात अडथळा आणल्याचा 1 अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे. मात्र, लोकसभेप्रमाणो विधानसभेला फॉर्म भरण्यासाठी नियमापेक्षा जास्त व्यक्ती जमा होण्याबाबत एकही गुन्हा दाखल झालेला नाही. त्याप्रमाणो विद्रुपीकरण, विनापरवाना निवडणूक कार्यालय उघडणो तसेच बॅनर जाळणो, याबाबत आतार्पयत एकही गुन्हा नोंदवलेला नाही.
टोल फ्री क्रमांकाला
उत्तम प्रतिसाद
निवडणूक कालावधीत तक्रारींसाठी (18क्क्-22-1953) हा हेल्पलाइन क्रमांक सुरू केला आहे. आतार्पयत एकूण 392 तक्रारी आल्या असून त्या निकाली काढल्या आहेत. यामध्ये आदर्श आचारसंहिताभंगाबाबत 9 तर इतर 385 तक्रारी या क्रमांकावर प्राप्त झाल्या होत्या. मात्र, निवडणूक खर्चविषयक एकही तक्रार आली नसल्याचे सूत्रंनी सांगितले.