शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

ठाणा नाका ते गोखले हॉल रस्त्याची दुरवस्था

By admin | Updated: January 25, 2017 05:05 IST

पनवेल शहरातील ठाणा नाका ते गोखले हॉलपर्यंतच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे

पनवेल : पनवेल शहरातील ठाणा नाका ते गोखले हॉलपर्यंतच्या रस्त्याची गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी रस्ते उखडले आहेत तर काही ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत, त्यामुळे या रस्त्याची त्वरीत दुरुस्ती करावी, तसेच याठिकाणी पथदिव्यांचीही व्यवस्था करावी, अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा शेतकरी कामगार पक्षाचे शहर चिटणीस प्रीतम म्हात्रे यांनी दिला आहे.पनवेल नगरपरिषदेचे रु पांतर आता महापालिकेत झाले आहे. रस्ते अतिक्रमणमुक्त झाले असले तरी त्यांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागते. शिवाय पादचाऱ्यांचीही गैरसोय होते. या रस्त्यांवरून एनएमएमटीच्या बसेस, विद्यार्थी वाहतूक सेवा सुरु आहे. त्याचप्रमाणे रस्त्यालगत रुग्णालय व पोलीस ठाणे आहे. त्यामुळे दररोज हजारो वाहनचालकांची व नागरिकांची वर्दळ याठिकाणी असते. याच रस्त्यावर काही महिन्यापूर्वी एनएमएमटीच्या धडकेने एका चिमुकल्याला जीव गमवावा लागला होता. मात्र तरी देखील प्रशासनाला जाग आलेली नाही. रस्ते दुरुस्त करण्याऐवजी याठिकाणी अनेक गतीरोधक बसविण्यात उभारण्यात आले आहेत. त्यामुळे कार, रिक्षा, दुचाकीवरून जाताना नागरिकांची हाडे चांगलीच खिळखिळी होतात. खड्ड्यांमुळे धुळ सर्वत्र पसरत असल्याने नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होतो. याठिकाणी छोटे मोठे अपघात तर रोजच घडतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. तरीही रस्त्याच्या कामाला अद्याप सुरु वात करण्यात आलेली नाही. त्यामुळे रास्ता रोको करण्याचा इशारा पनवेल शहरचे शेकाप चिटणीस प्रीतम म्हात्रे, प्रीती जॉर्ज, अनुराधा ठोकळ, सुरेखा मोहोकर यांनी दिला आहे. पनवेल नगरपालिका असताना हे काम मंजूर झाले आहे. त्याला आता वर्ष होत आहे. मात्र अजूनही काम सुरू झाले नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.