शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

लोंढे न थांबविल्यास पनवेलमध्ये आतंकवादी अड्डे,राज ठाकरेंनी दिला इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 02:38 IST

राज्यात रोज ४८ रेल्वेमधून परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. पनवेल टर्मिनसचे महत्त्व वाढत असून परप्रांतीयांचे लोंढे न थांबविल्यास या परिसरात आतंकवाद्यांचे अड्डे तयार होतील, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.

पनवेल : राज्यात रोज ४८ रेल्वेमधून परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत. पनवेल टर्मिनसचे महत्त्व वाढत असून परप्रांतीयांचे लोंढे न थांबविल्यास या परिसरात आतंकवाद्यांचे अड्डे तयार होतील, असा इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.राज ठाकरे यांनी पनवेलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. परप्रांतीयांची घुसखोरी थांबली पाहिजे. रोज परप्रांतीयांचे लोंढे मुंबईत धडकत आहेत. त्यांना वेळेत रोखले पाहिजे. पनवेलचे महत्त्व वाढत आहे. रेल्वे टर्मिनसमुळे भविष्यात येथेही परप्रांतीयांची संख्या वाढेल. या परिसरामध्ये आतंकवादी अड्डे तयार होण्यास वेळ लागणार नाही. परप्रांतीयांचे असेच लोंढे जर पनवेलमध्ये येत राहिले तर या ठिकाणी नवीन झोपडपट्ट्या तयार होऊन बंदुकी बनविण्याचे कारखाने तयार होतील, आणि त्यानंतर पनवेलकर काहीही करू शकणार नाहीत, असेदेखील ठाकरे यांनी सांगितले.कार्यकर्त्यांनी मतभेद विसरून पक्षवाढीसाठी काम करावे. एकमेकांच्या तक्रारी करत बसला तर घरचा रस्ता मोकळा असल्याचा इशाराही त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. बोगस मतदार याद्या उखडून काढा, जनतेच्या घराघरांपर्यंत जाऊन त्यांची मतदार यादीमध्ये नोंद आहे की नाही, हे तपासून पाहिले नाही तर लोक तुमच्याकडे काय अपेक्षा ठेवणार? जनतेसाठी काम करायला शिका आणि मग जनतेकडून अपेक्षा बाळगा, असा सल्लाही त्यांनी या वेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना दिला. ज्येष्ठ नागरिक संघ येथे एका कार्डिएक रु ग्णवाहिकेचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मनसेचे रायगड जिल्हाध्यक्ष अतुल भगत, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अक्षय काशिद, उप जिल्हाध्यक्ष अतुल चव्हाण, उप तालुकाध्यक्ष सूरज गायकर, प्रभारी पनवेल शहराध्यक्ष केदार सोमण, नवीन पनवेल शहराध्यक्ष यतीन देशमुख, कळंबोली शहराध्यक्ष रोहित दुधवडकर, मनसे विधानसभा सचिव प्रतीक वैद्य आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.