शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाला चावला उंदीर

By नामदेव मोरे | Updated: April 16, 2024 19:26 IST

इंदिरानगरमधील घटना : उंदीर चावल्यामुळे एक व्यक्तीवर ९ दिवस रुग्णालयात उपचार.

नवी मुंबई : झोपडपट्टी परिसरामध्ये उंदरांची समस्या गंभीर होत चालली आहे. सोमवारी दिवसा इंदिरानगरमध्ये ठाकरे गटाच्या उपशहर प्रमुखाला उंदीर चावला. याच परिसरामध्ये यापुर्वी एक व्यक्तीला दाेन वेळा उंदीर चावला. त्यांच्या पायाची जखम बळावली असून ९ दिवसांपासून त्यांच्यावर महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख महेश कोठीवाले सोमवारी दुपारी इंदिरानगर परिसरात कार्यालयाजवळ उभे होते. अचानक उंदराने त्यांच्या पायाला चावा घेतला. रक्तश्राव सुरू झाल्यामुळे त्यांनी तत्काळ नागरी आरोग्य केंद्रामध्ये धाव घेवून औषधे घेतली. याच परिसरामध्ये एक महिन्यापुर्वी विश्वनाथ शिंदे यांना दोन वेळा उंदीर चावला. त्यांना चार इंजेक्शन घ्यावी लागली आहेत. त्यांना मधुमेहाचा त्रास असल्यामुळे त्यांची जखम बळावली. यामुळे ९ दिवसापुर्वी त्यांना उपचारासाठी महानगरपालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायाची जखम बळावली होती.

तुर्भे, इंदिरानगर व शहरातील झोपडपट्टी परिसरात उंदीर चावल्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. या परिसरामध्ये मुषक नियंत्रणाची मोहीम प्रभावीपणे राबविण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. ज्या परिसरामध्ये जास्त उपद्रव आहे त्या परिसरात विशेष मोहीम राबविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. इंदिरानगर परिसरात सोमवारी दुपारी उभा असताना अचानक उंदीराने पायाला चावा घेतला. रक्तश्राव झाल्यामुळे नागरी आरोग्य केंद्रातून इंजेक्शन घेतले आहे.महेश कोठीवाले, उपशहर प्रमुख ठाकरे गट एक महिन्यापुर्वी दोन वेळा पायाला उंदीर चावला. चार इंजेक्शन घेतली. पायाची जखम बळावली असल्यामुळे ९ दिवसापासून महानगरपालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.विश्वनाथ शिंदे, नागरीक इंदिरानगर

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई