शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 00:40 IST

सहा महिन्यांतील तिसरी घटना

- वैभव गायकर पनवेल : कळंबोलीत बॉम्ब सापडल्याने पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे. येथील शाळेतील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे ही घटना निदर्शनास आल्याने अनुचित प्रकार टळला. मात्र, पनवेल शहराची मेट्रो सिटीकडे होणारी वाटचाल लक्षात घेता, नजीकच्या काळात दहशतवादी कारवाया वाढत चालल्याचे दिसून येत आहे.फेब्रुवारी महिन्यात पनवेल तालुक्यातील आपटा याठिकाणी जिवंत आयईडी बॉम्ब सापडल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे लागले होते. कर्जत-आपटा या बसमध्ये हे बॉम्ब सापडले होते. त्यानंतर कळंबोलीमधील हा प्रकार लक्षात घेता दहशतवादी पनवेल परिसरात सक्रिय तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.इसिसच्या दहशतवाद्यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी कर्नाळा परिसराची रेकी केली होती. दहशतवाद्यांना कर्नाळा परिसरात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प बनवायचे होते असा याच्यामागे तर्क-वितर्क लावला जात होता. सध्या पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असून आंतराष्ट्रीय विमानतळ, विकासाची अनेक कामे, रेल्वेचा विस्तार, मेट्रो, अनेक मोठमोठे गृहप्रकल्प या ठिकाणी उभे राहत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या संधी लक्षात घेता देशभरातील नागरिक या परिसरात स्थायिक होत आहेत.कळंबोलीत सापडलेला बॉम्ब सुधागड शाळेच्या परिसरात आढळला असून सर्वच तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे. पनवेल शिक्षणाचे माहेरघर म्हणून नव्याने उदयास येत आहे. तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. खासगी शाळांची संख्या मोठी आहे. त्यातच एखाद्या शाळेच्या आवारात बॉम्बसदृश वस्तू सापडणे चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे एटीएसचे प्रमुख देवेन भारती हे मंगळवारी कळंबोलीत दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडून घेतला.पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. पोलिसांच्या वेळोवेळी कारवाईत हे बाब सिद्ध झाली आहे. अशा अनधिकृतरीत्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर आवर घालण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पनवेलमधील लोकसंख्या आणखी वाढणार असून शहर प्रचंड व्यस्त होणार आहे. अशा परिस्थितीत शहराच्या जडणघडणीतच पोलीस प्रशासनाने सर्व बाबींवर बारकाईने लक्ष दिल्यास भविष्यातील धोका टाळता येईल.

टॅग्स :Bombsस्फोटकेterroristदहशतवादी