शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

खोपट्यात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी १३ जणांचे लचके तोडले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2023 14:34 IST

भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवाशांना घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मधुकर ठाकूर, उरण : उरण तालुक्यातील खोपटा गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने रविवारी (३०) एकाच दिवशी १३ जणांचे चावा घेऊन लचके तोडले आहेत.चाव्यांनी जखमी झालेल्या इसमांना उपचारासाठी येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवासी दहशतीखाली वावरत आहेत.

तालुक्यातील खोपटा गावात भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रचंड दहशत माजवली आहे.रविवारी (३०) दिवसभरात एकाच दिवशी नऊ जणांचे चावा घेऊन लचके तोडले आहेत.दामोदर बाळू ठाकुर (८०), चांगुणा प्रभाकर ठाकुर(५५),जयवंती धनंजय ठाकुर(४५),प्रियांका प्रवीण ठाकुर(२४),विघ्नेश प्रांजल पाटील(८),अब्दुल कादिर (३६)आदी सहा जखमींवर येथील इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक कालेल यांनी दिली. उर्वरित  सात रुग्णांवर खासगी रुग्णालयात अथवा घरच्या घरी उपचार सुरू असल्याची माहिती सरपंच विशाखा ठाकूर यांनी दिली.जखमीपैकी अब्दुल कादिर हा इसम सेंट्रिंगचे काम करण्यासाठी उरणहून खोपटा गावात आला होता.त्याचेही भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने लचके तोडले आहेत.

भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याच्या या दहशतीमुळे खोपट्यातील रहिवाशांना घराबाहेर पडताना दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.तसेच कुत्र्याच्या चाव्यामुळे जखमी झालेल्या इसमांनी त्वरित उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत.तातडीने उपाययोजना करण्यासाठी सरपंच, ग्रामस्थांनी सोमवारी उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांची भेट घेऊन चर्चा केली.चर्चेअंती खबरदारीची उपाययोजना म्हणून भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात येणार असल्याची माहिती उरण गटविकास अधिकारी समीर वाठावकर यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण