शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सहा केंद्रांवर आजपासून होणार दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 23:38 IST

सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना; नवी मुंबईतील १२७८ विद्यार्थी

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी-बारावीच्या लेखी फेरपरीक्षा आज २० नोव्हेंबरपासून सुरू होत आहेत. नवी मुंबई शहरातील सुमारे १२७८ विद्यार्थी या परीक्षांना सामोरे जात असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

कोरोनाच्या सावटामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी - बारावीच्या फेरपरीक्षा घेण्यास या वर्षी विलंब झाला आहे. शुक्रवारपासून लेखी परीक्षा घेण्यात येणार असून या परीक्षेला शहरातील बारावीचे ८७३ तर दहावीचे ४०५ विद्यार्थी बसले आहेत. बारावीसाठी शहरात तीन तर, दहावीसाठीही तीन परीक्षा केंद्रांवर या परीक्षा पार पडणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक परीक्षा केंद्रावर सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे. परीक्षेला येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असून प्रत्येक विद्यार्थ्याचे तापमान मोजण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करण्याच्या अनुषंगाने एका वर्ग खोलीत केवळ १२ परीक्षार्थी याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.

दहावी आणि बारावीच्या फेरपरीक्षेची सर्व तयारी झालेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने परीक्षा केंद्रांवर सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. एखाद्या विद्यार्थ्याचे तापमान अधिक आढळल्यास संबंधित विद्यार्थ्याशी चर्चा करण्यात येईल आणि परीक्षा देण्यासाठी त्या विद्यार्थ्याची तयारी असल्यास इतर विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये म्हणून अशा विद्यार्थ्यांची स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्यात येईल.- कृष्णकुमार पाटील, अध्यक्ष, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई