शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

विमानतळबाधित दहा गावांच्या स्थलांतराची मुदत संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 06:15 IST

अखेरच्या दिवशी मंगळवारी उत्स्फूर्त प्रतिसाद : पाच गावे १०० टक्के रिकामी

नवी मुंबई : विमानतळबाधित दहा गावांतील ग्रामस्थांना स्थलांतरासाठी दिलेली अखेरची मुदत मंगळवारी संपली. यानंतर कोणतीही मुदत दिली जाणार नसल्याने त्यामुळे होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी अखेरच्या दिवशी प्रकल्पग्रस्तांनी स्थलांतराच्या प्रक्रियेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, शेवटच्या टप्प्यात अर्ज देताना विमानतळबाधितांची गैरसोय होऊ नये, यासाठी सिडकोचा संबंधित विभाग रात्री ९ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात आला होता.

दहा गाव संघर्ष समितीच्या विनंतीनुसार ग्रामस्थांना स्थलांतरासाठी १५ जानेवारीची अंतिम मुदत होती. मंगळवारी शेवटच्या टप्प्यात बांधकामे निष्कासित करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर केले.सध्या स्थलांतरित होणाऱ्या दहा गांवापैकी वाघिवलीचा अपवाद वगळता उर्वरित नऊ गावे ९५ टक्के रिकामी झाल्याचा दावा सोमवारी सिडकोकडून करण्यात आला होता. मंगळवारी अखेरच्या दिवशी १०० टक्के स्थलांतर होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी सकाळपासून सिडकोच्या संबंधित विभागात प्रकल्पग्रस्तांची गर्दी होती.

शेवटच्या दिवसापर्यंत दहा गावांपैकी गणेशपुरी, तरघर, वाघिवली वाडा व वरचे ओवळे ही पाच गावे एक-दोन प्रकरणांचा अपवाद वगळता १०० टक्के रिकामी झाली आहेत. तर कोल्ही आणि चिंचपाडा ही दोन गावे ९५ टक्के स्थलांतरित झाली आहेत.उलवे आणि कोंबडभुजे या दोन गावांतून ७० टक्के ग्रामस्थांनी स्थलांतर केले आहे. वाघिवली या गावाचा विमानतळ गाभा क्षेत्राबाहेर समावेश होत असल्याने तूर्तास सिडकोला या गावाच्या स्थलांतराची घाई नाही. असे असले तरी आतापर्यंत या गावातील १५३ कुटुंबांपैकी ९० जणांनी स्थलांतर केले आहे.

अर्जांची दोन दिवसांत पडताळणी करणारबांधकाम निष्कासित करण्यासाठी अंतिम मुदतीच्या आत प्राप्त झालेल्या अर्जाची पुढील दोन दिवसांत संबंधित गावांत जाऊन पडताळणी केली जाईल. बांधकामे निष्कासित केल्याची खातरजमा केली जाणार आहे. त्यानंतर हा संपूर्ण अहवाल राज्य शासनाला पाठविला जाणार आहे. विशेष म्हणजे, ज्यांनी अर्ज दिले नाहीत; परंतु बांधकामे निष्कासित केली आहेत, त्यांचे त्याच दिवशी अर्ज स्वीकारले जातील, असे आंतरराष्ट्रीय नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाचे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी विजय पाटील यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई