शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

‘तेजस्विनी’ची चावी महिलेच्या हाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2019 23:35 IST

परिवहनच्या ताफ्यात सामील झालेल्या ‘तेजस्विनी’ बसची चावी महिला बसचालकाच्या हाती देण्यात आली आहे.

नवी मुंबई : परिवहनच्या ताफ्यात सामील झालेल्या ‘तेजस्विनी’ बसची चावी महिला बसचालकाच्या हाती देण्यात आली आहे. महिला दिनाचे औचित्य साधून प्रशासनातर्फे या महिला चालक बसचा शुभारंभ करण्यात आला.महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात महिलांसाठी आरक्षित असलेल्या दहा नव्या तेजस्विनी बसचाही समावेश झाला आहे. या बसचे चालक, वाहक व प्रवासी महिलाच असणार आहेत. तर गर्दीची वेळ वगळता पुरुष प्रवाशांनाही त्यातून प्रवास करण्याची मुभा दिली जाणार आहे. या दहा बससाठी राज्य शासनाने अडीच कोटींचा तर पालिकेने ५० लाखांचा निधी दिलेला आहे. मात्र, परिवहन उपक्रमाकडे सध्या दोनच महिला चालक असल्याने तूर्तास केवळ एकच तेजस्विनी रस्त्यावर धावण्यासाठी काढली आहे. त्याचा शुभारंभ शुक्रवारी वाशी डेपोत करण्यात आला. या प्रसंगी महापौर जयवंत सुतार, आमदार मंदा म्हात्रे, आमदार संदीप नाईक, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., परिवहन सभापती रामचंद्र दळवी आदी उपस्थित होते. ज्या मार्गावर महिला प्रवासी जास्त आहेत, त्या मार्गावर या बस चालवल्या जाणार आहेत. तर दहा गाड्यांसाठी आवश्यक चालक व वाहक महिलांची नियुक्ती झाल्यानंतर सर्वच बस महिलांच्या सेवेसाठी धावणार आहेत.या तेजस्विनीच्या उद्घाटन प्रसंगी आयटीएमएस प्रकल्पातील ई-तिकीट अ‍ॅपचे व स्मार्ट कार्ड योजनेचाही शुभारंभ करण्यात आला. हे स्मार्ट कार्ड प्रवाशांना बहु-उपयोगी असणार आहे.>उपमहापौरांना डावललेमहिला दिनाचे औचित्य साधून वाशीत तेजस्विनी बसचा शुभारंभ करण्यात आला. मात्र, या कार्यक्रमास उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांना आमंत्रण देण्याचा विसर अधिकाऱ्यांना पडला. महिला दिनाच्या दिवशीच महिलेला डावलले असल्याने म्हात्रे यांनीही प्रशासनाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.