शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
3
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
4
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
5
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
6
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
7
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
8
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
9
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
10
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
11
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
12
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
13
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
14
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
15
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स
16
६ महिन्यात सोन्यात तब्बल २६% वाढ! आता अजून वाढणार? 'या' ५ मार्गांनी करू शकता गुंतवणूक
17
हृदयद्रावक! हिमाचल प्रदेशात निसर्ग कोपला, डोंगरावरून खाली आले दगड; आई-मुलाचा मृत्यू
18
आधी ९० तास काम करण्याचा दिलेला सल्ला; आता त्यांचाच पगार २५ कोटींनी वाढला, किती मिळणार पॅकेज
19
Cast Certificate: 'त्या' लोकांचे जातीचे प्रमाणपत्र रद्द होणार; विधान परिषदेत फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले...
20
पती निक जोनाससोबत प्रियांका चोप्राचं लिप-लॉक, समुद्रकिनाऱ्यावरच रोमँटिक झालं कपल; बघा लेटेस्ट VIDEO

‘शाळाबाह्य’ने शिक्षकांची दमछाक

By admin | Updated: October 26, 2015 01:06 IST

उद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात.

प्राची सोनवणे, नवी मुंबईउद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात. मात्र सध्या शिक्षणव्यवस्थेने लादलेल्या अशैक्षणिक कामाच्या बोज्यामुळे शिक्षकांची दमछाक होत असल्याने कामाच्या अतिरिक्त ताणामुळे विद्यार्थ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत असताना पहायला मिळते आहे.जनगणना, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, मतदार याद्यांचे पुनर्गठण, शालेय पोषण आहार त्यात नव्याने भर पडलेल्या ‘सरल’ विद्यार्थ्यांची माहिती भरणे या सर्वच कामांमुळे शिक्षकवर्ग प्रचंड तणावाखाली वावरत असून विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असा प्रश्न पडतो. ऐन परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामात गुंतवल्याने याचा थेट परिणाम शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची माहिती एकाच संकेत स्थळावर उपलब्ध व्हावी, याकरिता सरल प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरु केली आहे. या प्रणालीचा वापर करताना वारंवार होणारा सर्व्हर डाऊन, रकाने भरण्याचे किचकट काम, सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक माहिती त्यांचा रक्तगट या सर्वच कामांमुळे शिक्षकवर्ग मानसिकदृष्ट्या खचत असल्याचे पहायला मिळते. शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठीही ही सरल प्रणाली तापदायक ठरली आहे. हे संकेत स्थळ रात्रीच्या वेळेत सुरळीतपणे सुरु असतात मात्र त्यावेळी यावर काम करणे शक्य नसते. परीक्षांचे आयोजन, शाळेतील उपक्रम, ठरावीक कालावधीत पूर्ण करावा लागणारा विषयाचा अभ्यासक्रम या साऱ्या गोष्टींसाठी मात्र शिक्षकांकडे पुरेसा वेळच मिळत नाही. ‘सरल’चे काम पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कामकाज मात्र संथगतीने सुरु असल्याची तक्रार पालक करत आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला, रक्तगट तपासणी, आधारकार्ड क्रमांक, बँक खाते, जन्मखूण आदी कौटुंबिक माहिती संकलित करण्यासाठी पालकांचीही मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. लवकरच सुरू होणाऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही उपक्रमांतर्गत जनगणना सुरु होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करुन प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर नोंदवून डाटा बेस तयार केला जाणार आहे. २०११ मध्ये जनगणनेप्रसंगी यादीतील स्थलांतरित वा निधन झालेल्यांची नावे वगळणे व नवीन रहिवाशी किंवा जन्म झालेल्या व्यक्तींची नावेही यामध्ये अंतर्भूत करावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शाळांतील शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.