शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘शाळाबाह्य’ने शिक्षकांची दमछाक

By admin | Updated: October 26, 2015 23:58 IST

उद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात.

प्राची सोनवणे, नवी मुंबईउद्याचा नागरिक घडवित असताना प्रत्येक शिक्षक आपले सर्वस्व पणाला लावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करतात. मात्र सध्या शिक्षणव्यवस्थेने लादलेल्या अशैक्षणिक कामाच्या बोजामुळे शिक्षकांची दमछाक होत असल्याने कामाच्या अतिरिक्त ताणामुळे विद्यार्थ्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.जनगणना, शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण, मतदार याद्यांचे पुनर्गठण, शालेय पोषण आहार त्यात नव्याने भर पडलेल्या ‘सरल’ विद्यार्थ्यांची माहिती भरणे या सर्वच कामांमुळे शिक्षकवर्ग प्रचंड तणावाखाली वावरत असून विद्यार्थ्यांना शिकवायचे कधी, असा प्रश्न पडतो. ऐन परीक्षेच्या कालावधीत शिक्षकांना अशा अशैक्षणिक कामात गुंतवल्याने याचा थेट परिणाम शाळेतील विद्यार्थी आणि त्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांची माहिती एकाच संकेत स्थळावर उपलब्ध व्हावी, याकरिता सरल प्रणालीच्या माध्यमातून आॅनलाइन माहिती भरण्याची प्रक्रिया शिक्षण विभागाकडून सुरु केली आहे. या प्रणालीचा वापर करताना वारंवार होणारा सर्व्हर डाऊन, रकाने भरण्याचे किचकट काम, सर्व विद्यार्थ्यांची कौटुंबिक माहिती त्यांचा रक्तगट या सर्वच कामांमुळे शिक्षकवर्ग मानसिकदृष्ट्या खचत असल्याचे पहायला मिळते. शिक्षकांबरोबरच मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थी यांच्यासाठीही ही सरल प्रणाली तापदायक ठरली आहे. हे संकेत स्थळ रात्रीच्या वेळेत सुरळीतपणे सुरु असतात मात्र त्यावेळी यावर काम करणे शक्य नसते. परीक्षांचे आयोजन, शाळेतील उपक्रम, ठरावीक कालावधीत पूर्ण करावा लागणारा विषयाचा अभ्यासक्रम या साऱ्या गोष्टींसाठी मात्र शिक्षकांकडे पुरेसा वेळच मिळत नाही. ‘सरल’चे काम पूर्ण करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शालेय विद्यार्थ्यांच्या अध्यापनाचे कामकाज मात्र संथगतीने सुरु असल्याची तक्रार पालक करत आहे. तसेच उत्पन्नाचा दाखला, रक्तगट तपासणी, आधारकार्ड क्रमांक, बँक खाते, जन्मखूण आदी कौटुंबिक माहिती संकलित करण्यासाठी पालकांचीही मोठ्या प्रमाणात धावपळ होत असल्याची माहिती शिक्षकांनी दिली. लवकरच सुरू होणाऱ्या राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही उपक्रमांतर्गत जनगणना सुरु होणार आहे. यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अद्ययावत करुन प्रत्येक नागरिकाचा आधार क्रमांक आणि मोबाइल नंबर नोंदवून डाटा बेस तयार केला जाणार आहे. २०११ मध्ये जनगणनेप्रसंगी यादीतील स्थलांतरित वा निधन झालेल्यांची नावे वगळणे व नवीन रहिवाशी किंवा जन्म झालेल्या व्यक्तींची नावेही यामध्ये अंतर्भूत करावयाची आहे. या कामासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांसह खाजगी शाळांतील शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे.महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या नवी मुंबई शाखेचे अध्यक्षांनी शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये यासाठी २९ जून रोजी बीएलओ संदर्भातील (याचिका क्र. ५७३६) आणि ९ आॅक्टोबर रोजी एनपीआर संदर्भातील (याचिका क्र. ९९८८)अशा दोन जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल केल्या होत्या. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने शिक्षकांना देण्यात येणाऱ्या अशैक्षणिक कामांना स्थगिती देण्याचा महत्त्वाचा निर्णय देण्यात आला. शासनाच्या या निर्णयामुळे सर्वच शिक्षकवर्गात आनंदाचे वातावरण असून या अशैक्षणिक कामातून सुटका झाल्याने प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे अधिक लक्ष देऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघटनेचे नवी मुंबईचे शाख्या अध्यक्ष हृदयनाथ तांडेल यांनी व्यक्त केले आहे.