शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सुटीचा मुहूर्त साधून इच्छुकांनी साधला मतदारांशी संवाद

By admin | Updated: April 24, 2017 02:39 IST

पनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. प्रत्येक प्रभागात

नितीन देशमुख / पनवेलपनवेल महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यानंतरच्या पहिल्याच रविवारी उमेदवारांनी मतदारांच्या गाठीभेटीवर भर दिला. प्रत्येक प्रभागात पक्षाचे कार्यकर्ते व उमेदवार फिरताना दिसत होते. शनिवार व रविवारच्या सुटीचा पुरेपूर वापर प्रचारासाठी कार्यकर्ते करताना दिसत होते. शाळांना सुटी लागल्याने अनेक जण गावी अथवा फिरायला जाण्याच्या विचारात आहेत. अशा चाकरमान्यांची भेट घेऊन मतदानासाठी प्रोत्साहित करण्यावर उमेदवार भर देत आहेत. तर कार्यकर्ते गावी गेलेल्या मतदारांशी संपर्क साधून २४ मे रोजी मतदारासाठी आवर्जून येण्याचे आवाहन करीत आहेत. पनवेल महानगरपालिकेसाठी २० प्रभागातून ७८ नगरसेवक निवडून द्यावयाचे आहेत. शेकापक्ष, राष्ट्रवादी व काँग्रेस यांनी महाआघाडी केली आहे. भाजपा व सेना यांच्यात अद्याप युती झालेली नाही. याठिकाणी मनसेची ताकद नगण्यच आहे. सुट्या लागल्याने बाहेरगावी जाणाऱ्या मतदारांना रोखण्यासाठी पक्षांकडून भेटीगाठींवर भर दिला जात आहे. शेकापची मदार ग्रामीण मतदारांवर असल्याने २४ मे रोजी निवडणूक जाहीर होताच त्यांना जास्त आनंद झाला. रायगड जिल्ह्यातील पहिल्या महापालिकेत आपलाच उमेदवार महापौर व्हावा, यासाठी भाजपाने व्यूहरचना तयार केली आहे. त्यासाठी सुरुवातीला युवा नेता परेश ठाकूर यांचे नाव पुढे होते. मात्र महापौरपद महिला आरक्षित झाल्याने पुन्हा शोधमोहीम सुरू झाली आहे. याशिवाय मतदार यादीत झालेल्या घोळाचाही भाजपाला फटका बसण्याची शक्यता आहे. नवीन आयुक्तांनी मतदार याद्या दुरुस्तीचे आश्वासन दिले असले तरी अद्याप सुधारित याद्या प्रसिध्द न झाल्याने मतदारांमध्ये नाराजी आहे. याचा परिणाम मतदानाच्या टक्क्यावर होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. प्रभाग १७ मध्ये मतदार यादीत अनेक घोळ असल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष मनोज भुजबळ यांनी दाखवून दिले. त्याबाबत त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या प्रभागातील एका वकिलाने आपले नाव राहत असलेल्या प्रभागात नसून दुसऱ्या प्रभागात असल्याबद्दल न्यायालयात दाद मागितली आहे. माजी उपनगराध्यक्षांच्या घरातील मते ही विभागली गेली आहेत. त्यामुळे या प्रभागातील भाजपाचे उमेदवार मनोज भुजबळ शनिवार व रविवार कडक उन्हात घरोघर फिरून जास्तीत मतदारांजवळ संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना दिसत होते.