शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील तलाठी कार्यालये बंद

By admin | Updated: November 17, 2016 05:58 IST

तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे.

जिल्ह्यातील तलाठी कार्यालयेबंदश्रीवर्धन : तालुक्यातील १८ तलाठी कार्यालयांना कुलूप ठोकण्यात आले आहे. तालुक्यातील १५ तलाठी व १ मंडळ अधिकारी बुधवार, १६ नोव्हेंबरपासून बेमुदत संपात सामील झाले आहेत. आता जोपर्यंत मंत्रालय पातळीवर तलाठ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय होत नाही, तोपर्यंत तलाठी सामुदायिक रजेवर राहणार आहेत. आता केंद्र सरकारने ५०० व १ हजारच्या नोटा चलनातून बाद केल्यामुळे सर्वांनी बँकांमध्ये धाव घेतली आहे. सध्या तलाठ्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाही वेळ नाही. तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत खासदार, पालकमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार यांना निवेदने दिली. मात्र, एकाही लोकप्रतिनिधीने तलाठ्यांच्या मागण्यांचा विचार केलेला नाही. त्यामुळे त्यांना संपाचे हत्यार उपसावे लागले आहे.तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी काळ्या फिती लावून काम केले. ७ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. १० नोव्हेंबर रोजी अतिरिक्त कार्यभाराच्या चाव्या तहसीलदारांकडे जमा केल्या. १० नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत आपल्या मागण्या लोकप्रतिनिधींच्या कानावर घातल्या. एवढे करूनही शासनाला जाग येण्यासाठी कामकाज थांबवले, आता तरी शासन मागण्यांचा विचार करेल, अशी अपेक्षा तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आहे. ३ नोव्हेंबरपासून आंदोलनाचे टप्पे १४ नोव्हेंबरपर्यंत पार पाडूनही आपल्या मागण्यांकडे सरकारने लक्ष न दिल्यामुळे बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय तलाठ्यांनी घेतला आहे. आता मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, असा इशारा महासंघाने दिला आहे. (वार्ताहर)प्रमुख मागण्याच्तलाठी सजाची व महसूल मंडळाची पुनर्रचना करा, ७/१२ संगणकीकरण व ई- फेरफारमधील अडचणी सोडवा, सर्व्हर स्पीड करा, सॉफ्टवेअरमधील अडचणी दूर करा, लॅपटॉप व प्रिंटर पुरवा, तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना पायाभूत प्रशिक्षण द्या, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळा, तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय बांधून द्या, मंडळाधिकाऱ्यांना कार्यालयीन भाडे मंजूर करा, महसूल खात्यात पदोन्नतीसाठी द्विस्तरीय पद्धतीचा अवलंब करा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवा आदी विविध मागण्या आहेत अशी माहिती मंडळ अधिकारी बी.टी.बुर्शे यांनी दिली आहे.महाड तालुक्यातील १८५ गावांचे महसुली कामकाज ठप्प दासगाव/महाड : वेळोवेळी शासनाकडे मागण्या करून देखील शासनाने तलाठ्यांच्या मागण्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे बुधवारपासून राज्यातील सर्व तलाठ्यांबरोबर महाड तालुक्यातील १८५ गावांचे ३६ तलाठी तसेच मंडल अधिकारी बेमुदत संपावर गेले आहेत. मात्र संपावर जाण्याअगोदर १० नोव्हेंबर रोजी डीएससी डीवायएस, तसेच कार्यालयाच्या कपाटाला तसेच कार्यालयाला लॉक लावून त्यांच्या चाव्या महाड तहसीलदारंकडे जमा केल्या आहेत. मात्र या संपामुळे पुन्हा नागरिकांना नोटांच्या संकटाबरोबर दुसऱ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. महाड तालुक्यात ३६ तलाठी सजा आहेत, तसेच ६ मंडल अधिकाऱ्यांची नेमणूक आहे. राज्यातील सर्व तलाठ्यांच्या अनेक समस्या प्रलंबित आहे. अनेक वर्षांपासून तलाठी संघटना शासनाकडे समस्या दूर करण्यासाठी भांडत आहे. मात्र शासन याकडे दुर्लक्ष करत आहे.अलिबागमध्ये तलाठी संपावरअलिबाग : रायगड जिल्ह्यातील तलाठी बुधवारपासून बेमुदत संपावर गेले आहेत. तलाठ्यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय व्यवहारांना चांगलीच खिळ बसली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तलाठ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. सातत्याने पाठपुरावा करूनही सरकारने आश्वासनांची खैरातच दिली आहे. त्यामुळे बेमुदत संपाचे हत्यार उपसावे लागल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.तलाठी यांच्या संपामुळे ग्रामीण भागातील प्रशासकीय कामे थंडावणार आहेत. फेरफार उतारे, वारस नोंद, सात बारा उतारा देणे, त्याची नोंद करणे, मालमत्ता कर यासह अन्य १८ विविध कामे रखडणार आहेत. त्याचा नाहक त्रास सर्वसामान्य शेतकरी, नागरिकांना होत आहे. तलाठ्यांच्या संपावर लवकरात लवकर तोडगा न निघाल्यास नागरिकांच्या त्रासामध्ये चांगलीच भर पडणार आहे.