शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणातील दोषींवर कारवाई करा

By admin | Updated: February 16, 2017 02:18 IST

अतिक्रमण प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नगरसेवक मनोहर मढवी यांनी बुधवारी महासभेत केली.

नवी मुंबई : अतिक्रमण प्रकरणात दोषी असणाऱ्या सर्वांवर कारवाई केली जावी, अशी मागणी नगरसेवक मनोहर मढवी यांनी बुधवारी महासभेत केली. आयुक्त हे दुटप्पी धोरण राबवत असून ते फक्त नगरसेवकांची पदे घालवायला बसले आहेत; परंतु मोकाट असलेले भूमाफिया व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होताना दिसत नसल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.शहरात अनधिकृत झोपड्यांवर प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईचे पडसाद बुधवारी महासभेत उमटले. या वेळी झोपड्यांवर कारवाई केली जात असताना, भूमाफियांवरच्या कारवाईकडे मात्र प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नगरसेवक मनोहर मढवी यांनी केला. अनधिकृत बांधकामे व झोपड्या रातोरात उभ्या राहत नसून, त्यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचेही हात गुंतलेले आहेत. भूमाफियांनी जागा बळकावून त्यावर उभारलेल्या झोपड्या गरिबांना विकल्या आहेत. अशा भूमाफियांवर गुन्हे दाखल करून अधिकाऱ्यांचीही चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली. तर अशाप्रकारचे न्यायालयीन आदेश दिघा प्रकरणात प्रशासनाला प्राप्तही झालेले आहेत. त्यानंतरही अद्याप एकाही अधिकाऱ्यावर कारवाई झाल्याचे दिसत नाही. यामुळे फक्त नगरसेवकांची पदे घालवायला ते बसलेत का? असा टोलाही त्यांनी मारला. झोपड्या अनधिकृत असल्याचे माहीत असतानाही, त्या ठिकाणी वीज, पाणी कसे पोहोचते? असा प्रश्न उपस्थित करत, अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय हे शक्य नसल्याचे ते म्हणाले. यामुळे अतिक्रमणाला अधिकारीच जबाबदार असून तत्कालीन विभाग अधिकाऱ्यांचे ब्रेन मॅपिंग होण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. शिवाय यामध्ये नगरसेवकही दोषी असल्यास त्यांच्यावरही कारवाई करावी; परंतु आयुक्तांचे धोरण दुटप्पी असल्याची खंतही त्यांनी सभागृहात व्यक्त केली. तर कारवाईमध्ये झोपडीधारकांकडे माणुसकी म्हणून पाहण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. या वेळी नगरसेवक प्रशांत पाटील यांनी घणसोली सेक्टर १ व परिसरातील रो हाऊसमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची मागणी केल्याचे सांगितले; अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण यांनी अतिक्रमण प्रकरणात सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)