शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

टॅबचे राजकारण रंगले

By admin | Updated: August 4, 2015 02:37 IST

शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारा आणि त्यानंतरच टॅब वितरणाचे प्रयोग करा, असा सल्ला देत महापालिकेतील विरोधी पक्षांनी टॅबची खरेदी विद्यार्थ्यांकरिता नाही

मुंबई : शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारा आणि त्यानंतरच टॅब वितरणाचे प्रयोग करा, असा सल्ला देत महापालिकेतील विरोधी पक्षांनी टॅबची खरेदी विद्यार्थ्यांकरिता नाही तर कंत्राटदारांचे खिसे भरण्याकरिता करण्यात येत असल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या टॅबचे गोडवे गायले असतानाच आता विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणाऱ्या टॅबवरून महापालिकेचा आखाडा भलत्याच राजकारणाने रंगू लागला आहे. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या टॅबचे कौतुक केल्याने भाजपाने या प्रकरणी मौन बाळगले आहे.महापालिका शाळांतील आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या टॅबच्या खरेदीचा प्रस्तावही स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला आहे. परंतु सेनेच्या वचननाम्यातील टॅबची खरेदी होण्यापूर्वीच महापालिकेतील विरोधी पक्षांच्या विरोधामुळे राजकीय वातावरण तापले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठवीमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी २२ हजार टॅबची खरेदी केली जाणार आहे. यासाठी पालिका १५ कोटी ६१ लाख रुपये खर्च करणार आहे. तर आगामी शैक्षणिक वर्षांत आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यासाठी १६ कोटी ७६ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. दोन्ही वर्षांसाठी टॅब पुरविण्याचे कंत्राट ‘टेक्नो इलेक्ट्रॉनिक्स’ कंपनीला देण्यात आले आहे. मात्र या टॅब खरेदीवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या टॅबचे कौतुक केल्याने भाजपाने या प्रश्नावर ‘अळीमिळी गुपचिळी’ धोरण स्वीकारले आहे. (प्रतिनिधी)