शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

महासभेत माईक हिसकावणा-या नगरसेवकाचे पंधरा दिवसांसाठी निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 03:02 IST

पनवेल महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून सभागृहाचा अवमान करणारे शेकाप नगरसेवक अजीज मोहसीन पटेल यांना १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहे.

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या विशेष सभेत नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून सभागृहाचा अवमान करणारे शेकाप नगरसेवक अजीज मोहसीन पटेल यांना १५ दिवसांकरिता निलंबित करण्यात आले आहे. याबाबत महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी महासभेतील गैरशिस्तीबाबत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमान्वये अजीज पटेल यांच्यावर कारवाई केली आहे.यासंदर्भात महापौर डॉ. चौतमोल यांनी पटेल यांना जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता पनवेल महानगरपालिकेच्या आद्यक्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृहामध्ये महापालिका हद्दीतील विविध विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी विशेष सभा बोलाविण्यात आली होती. या सभेमध्ये पटलावरील विषय क्र मांक २ महापालिका हद्दीतील सर्व विभागांचा कचरा उचलण्यास विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून ई-निविदा प्रसिद्ध करून ठेकेदार नियुक्त करण्याबाबत व महापालिका क्षेत्रातील सिडकोच्या अखत्यारीतील असलेल्या सेवा पनवेल महापालिकाकडे हस्तांतरित करण्याबाबत चर्चा करून निर्णय घेणे यावर सभागृहामध्ये चर्चा सुरू होती. त्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोंधळसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे व या प्रस्तावावर सभागृहामध्ये एकमत होत नसल्याने हा प्रस्ताव मतास टाकण्यात आला. यासाठी मतदान प्रक्रि या सुरू करण्याचे आदेश पीठासन अधिकारी या नात्याने मी नगरसचिवांना दिले. यानंतर नगरसचिवांमार्फत या प्रस्तावावर मतदान प्रक्रि या सुरू असताना आपण अचानक व्यासपीठावर धावत येऊन नगरसचिवांच्या हातातील माईक खेचून घेऊन गेलात.लोकशाही पद्धतीने सुरू असलेली कायदेशीर मतदानप्रक्रि या बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आपणास वारंवार सभागृहाच्या बाहेर जाण्याचे आदेश देऊनही आपण सभागृह सोडले नाही व आपल्या वर्तनात सुधारणा झाली नाही. आपले हे वर्तन महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींना बाधा पोहोचविणारे असून, सभाशास्त्रातील नियमांना धरून नाही, तसेच सभागृहाची प्रतिमा जनमानसात मलिन करणारे आहे.सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील प्रकरण २ मधील कलम २(२) अन्वये मला प्राप्त अधिकारानुसार पनवेल महापालिकेचे सदस्य अजीज मोहसीन पटेल यांना ७ डिसेंबरपासून पुढील १५ दिवसांकरिता महापालिकेच्या सभांना उपस्थित राहण्यापासून निलंबित करीत आहोत. ७ डिसेंबरपासून पुढील १५ दिवसांच्या कालावधीत होणाºया म्हणजेच १८ डिसेंबरच्या महासभेस आपण उपस्थित राहू नये. उपरोक्त आदेशांचे पालन करण्यात यावे, असे डॉ. चौतमोल यांनी कारवाई पत्रात स्पष्ट केले आहे.या निर्णयाचा आम्ही निषेध करीत आहोत. नागरिकांच्या महत्त्वाच्या प्रश्नावर सभागृहात बोलत असताना आमचे माईक बंद केले. त्यामुळेच चालू असलेला माईक आमच्या नगरसेवकाने सचिवाकडून घेतला. सत्ताधारी मनमानी करीत आहेत. म्हणून हा निर्णय त्यांनी घेतला आहे.- प्रीतम म्हात्रे,विरोधी पक्षनेते,पनवेल महानगरपालिका

टॅग्स :panvelपनवेल