शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेतील १५ नगरसेवकांचे निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 01:46 IST

महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शेकाप महाविकास आघाडीचे १४ व एका भाजप नगरसेविकेचे सोमवारी निलंबन केले.

पनवेल : शासनाच्या निर्देशानुसार पालिकेची सभा ऑनलाईन आयोजित केल्यानंतरही शेकाप महाविकास आघाडीचे नगरसेवक सभागृहात उपस्थित राहिल्याने पीठासीन अधिकारी महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी शेकाप महाविकास आघाडीचे १४ व एका भाजप नगरसेविकेचे सोमवारी निलंबन केले. मालमत्ता कर आकारणीसाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत परवानगी नसताना हजर राहून गोंधळ घातल्याप्रकरणी ही कारवाई केली.या नगरसेवकांमध्ये भाजपच्या नगरसेविका लीना गरड, शेकापचे नगरसेवक गणेश कडू, शंकर म्हात्रे, गोपाळ भगत, रवींद्र भगत, ज्ञानेश्वर पाटील, राष्ट्रवादीचे नगरसेवक विजय खानावकर, विष्णू जोशी, डॉ. सुरेखा मोहोकर, प्रीती जॉर्ज म्हात्रे, प्रिया भोईर, उज्वला पाटील, प्रज्योती म्हात्रे, कमल कदम, सारिका भगत आदी नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले. मालमत्ता करासारख्या महत्त्वाच्या विषयी सभागृहात आम्हाला बाजू मांडून द्यावी म्हणून विरोधी पक्षाचे नगरसेवक सभागृहात हजर राहिले होते. ऑनलाईन सभेत सत्ताधारी बोलू देत नसल्याने विरोधकांनी सभागृहात हजेरी लावली. विशेष म्हणजे दोन तास विरोधकांनी महापौरांना सभा सुरू करण्याची विनंती केली. मात्र महापौरांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बाहेर जाण्यास सांगितले. तरीही विरोधी पक्षातील सदस्य आपल्या मागणीवर ठाम होते. यानंतर पोलिसांना सभागृहात पाचारण करण्यात आले. पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी विरोधकांची समजूत काढत त्यांना सभागृहाबाहेर काढले.  यानंतर विशेष सभा सुरू झाली. प्रशासनाने मालमत्ता कर प्रणालीची माहिती दिली. मात्र गोंधळामुळे उशीर झाल्याने सभा तहकूब करण्यात आली. तहकूब सभा ६ एप्रिल रोजी पार पडणार आहे.