शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

निलंबित ठेकदारांवर मेहरनजर? पनवेल महापालिकेतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 06:59 IST

कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

- वैभव गायकरपनवेल  - कामगारांचे आर्थिक शोषण केल्याचा ठपका ठेवत ठेका रद्द करण्यात आलेल्या मनुष्यबळ पुरवठा करणाऱ्या श्री कॉम्प्युटर्स या ठेकेदाराचे काम अद्यापि सुरूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महासभेने ठेका रद्द करण्याचा निर्णय घेऊनही प्रशासनाने संबंधित ठेकेदारावर मेहरनजर दाखवित मागील सात महिन्यांत लाखो रुपयांची देयके अदा केल्याचे समोर आले आहे. या प्रकाराची महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी गंभीर दखल घेतली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले आहेत. संबंधित ठेकेदारांच्या विरोधातील वाढत्या तक्रारींची दखल घेत नोव्हेंबर २0१७मध्ये झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर डॉ. कविता चौतमल यांनी कंत्राट रद्द करण्याचे आदेश दिले होते. परंतु सात महिने उलटले तरी सदर कंत्राटदाराने आपले काम थांबविले नसल्याचे दिसून आले आहे. मागील सात वर्षांपासून संबंधित ठेकेदार पालिकेत कार्यरत आहे. नगर परिषदेचे रूपांतर पनवेल महानगरपालिकेत झाल्यानंतरदेखील हाच कंत्राटदार महापालिकेला डेटा एंट्री आॅपरेटर पुरवत आहे. विशेष म्हणजे तत्कालीन नगर परिषदेने केलेल्या ठरावाच्या बळावर अद्यापि हा ठेका सुरू आहे. संबंधित कंत्राटदाराने पालिकेच्या कंत्राटी कामगारांच्या सह्या घेऊन ५ हजार रुपये जीएसटीपोटी कपात केल्याचा प्रकार यापूर्वी उघडकीस आला होता. विशेष म्हणजे खुद्द सभागृह नेते परेश ठाकूर यांनीच यासंदर्भात खुलासा केला होता. श्री कॉम्पुटर्सला पालिकेत मनुष्यबळ पुरविण्याचा ठेका मिळाला आहे. त्याच्यामार्फत ८0 कर्मचारी पुरविलेत. या कामगारांना केवळ ११00 रुपये वेतन दिले जात आहे. हे वेतनही वेळेवर होत नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे.पत्नीच्या नावाने वेतनश्री कम्पुटर्सचे ठेकेदार आदेश नाईक यांच्या मार्फत पालिकेत मनुष्यबळ पुरविले जाते. या यादीत ठेकेदारांच्या पत्नीचेदेखील नाव आहे. मागील अनेक महिन्यांपासून माधुरी आदेश नाईक यांच्या नावाने पालिकेच्या मार्फत वेतन दिले जात आहे. महापालिकेमार्फत मंत्रालयात सदर कर्मचारी कार्यरत असल्याचे ठेकेदाराचे म्हणणे आहे. मात्र पालिकेला मंत्रालयात कर्मचारी नेमण्याची गरज काय पडली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.कार्यरत नसतानाही बायोमेट्रिक हजेरीमहापालिकेत कार्यरत नसतानादेखील संबंधित कर्मचाºयाची बायोमेट्रिक हजेरी लागलीच कशी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे संबंधित कर्मचारी पालिकेत अनेक महिन्यांपासून कार्यरत असतानाही त्याची माहिती कोणालाच नाही, याबाबतही संभ्रम निर्माण झाला आहे.आयुक्तांनी घेतली गंभीर दखलसंबंधित कंत्राटदारामार्फत स्वत:च्या पत्नीच्या नावाने मागील अनेक महिन्यांपासून वेतन काढले जात असल्याच्या प्रकाराची महापालिका आयुक्त देशमुख यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी संबंधित ठेकेदाराला नोटीस बजावली असून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.सध्याच्या घडीला कोंकण पदवीधर संघाची आचारसंहिता लागू असल्याने महापालिकेला लगेच नवीन कंत्राटदाची नियुक्ती करता येणार नाही. असे असले तरी पुढील महिनाभरात निविदा काढून नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली जाईल.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेलnewsबातम्या