शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सर्वपक्षीय इच्छुक उमेदवारांचा जीव टांगणीला

By admin | Updated: May 2, 2017 03:30 IST

पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस उरलेले आहेत. मात्र, असे असले तरी भाजपासह, शिवसेना

 पनवेल : पनवेल महापालिकेच्या निवडणुकीचे अर्ज दाखल करण्यासाठी चार दिवस उरलेले आहेत. मात्र, असे असले तरी भाजपासह, शिवसेना व शेकाप आघाडीचे उमेदवार निश्चित झालेले नाहीत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मनात घालमेल वाढू लागली आहे. पनवेल महापालिका निवडणुकीत इच्छुक उमेदवारांना नामनिर्देशनपत्र ६ मे २०१७पर्यंत दाखल करण्याची मुदत आहे. मात्र, पनवेलमधील प्रमुख पक्षांची उमेदवारी अद्यापही जाहीर न झाल्याने शेवटच्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ शकते. असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भाजपा व शिवसेना यांची युती होणार की नाही, या विवंचनेत सारेच सापडले होते. त्यामुळे शेकाप आघाडीनेही आपले उमेदवार घोषित केलेले नाहीत. अखेर भाजपा व शिवसेनेची युती न झाल्याने शेकाप आघाडीदेखील काँग्रेस व राष्ट्रवादी सोबत जागावाटप करून उमेदवारी घोषित करणार आहे. भाजपा व शिवसेनेच्या युतीबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांना विचारले असता, शिवसेनेसोबत युतीचा विषय संपला असल्याचे सांगत त्यांनी युतीच्या विषयावर पडदा टाकला. शेकाप व काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी होऊन दीड ते दोन महिने उलटून गेले आहेत. तरीदेखील आघाडीचे जागावाटप करण्यात आलेले नाही. आघाडीच्या जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटलेला दिसत नाही. महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने १६ जागांची मागणी केली होती. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वसंत ओसवाल यांना याबाबत विचारले असता, आघाडीतून आम्हाला १२ जागा मिळाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, काँग्रेस पक्षाला किती जागा मिळणार आहेत हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. पसंतीच्या प्रभागातून तिकीट मिळत नसल्याने काँग्रेसचे काही इच्छुक उमेदवार नाराज झाल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे काही प्रभागांतून आघाडीला बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत यांना याबाबत विचारले असता, त्यांनी बैठकीमध्ये असल्याचे सांगत यावर बोलण्याचे टाळले.