शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील झोपडपट्ट्यांचे पालिकेने सुरू केले सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2018 03:00 IST

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर देण्यासाठी पनवेल महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

वैभव गायकरपनवेल : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्येकाला घर देण्यासाठी पनवेल महापालिकेने कंबर कसली आहे. शहरातील झोपडपट्ट्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. याकरिता देवधर असोसिएट्स कंपनीला सर्व्हेचे काम दिले गेले आहे. वर्षअखेरीस हे सर्वेक्षणाचे काम संपवून लाभार्थ्यांची संख्या निश्चित केली जाणार आहे. मुंबईतल्या एसआरएच्या धर्तीवर बिल्डरांच्या मदतीने झोपडपट्टीतील नागरिकांना घरे दिली जाणार आहेत. तसेच इंट्रेस्ट सबसिडीअंतर्गत सहा लाखापर्यंतचे उत्पन्न असलेल्यांना घरे दिली जाणार आहेत. त्यामुळे शहर झोपडपट्टीमुक्त करण्याची दुसरी मोहीम सुरू होणार आहे.पनवेल महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वी नगरपरिषद हद्दीत असलेल्या झोपडपट्टीचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. व्हीआरपी या एजन्सीमार्फत हे सर्व्हेचे काम पूर्ण केले गेले आहे. त्यावेळी ४५९१ झोपड्यांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. याकरिता नवीन विकास आराखडा तयार केला जाणार आहे. कालीमाता नगर, वाल्मीकी नगर, लक्ष्मी वसाहत आदींचा यामध्ये समावेश आहे. या व्यतिरिक्त पालिकेत समाविष्ट असलेल्या २९ गावांच्या लगत असलेल्या झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अद्याप पाच गावांलगतच्या झोपडपट्ट्यांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. याकरिता पंतप्रधान आवास योजनेचे फॉर्म भरून संबंधितांना माहिती देण्याचे काम देवधर असोसिएट्स ही एजन्सी करीत आहे. विशेष म्हणजे योजनेला झोपडपट्टीधारकांकडून योग्य प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. अनेक वेळा अशाप्रकारच्या योजना आल्या आहेत, मात्र त्यांची अंमलबजावणी झाली नसल्याने झोपडपट्टीधारक उदासीन असल्याचे दिसून येत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत प्रत्येकाला तीनशे स्केअरफूटचे घर दिले जाणार आहे. तसेच त्यासाठी विविध पर्याय लाभार्थ्यांसमोर ठेवले जाणार आहेत. झोपडपट्ट्यांच्याच जागेवर पीपीपी प्रकल्पातंर्गत लाभार्थ्यांला घरे दिली जाणार आहेत. तर इंट्रेस्ट सबसिडीत लाभार्थ्याला जवळपास अडीच ते साडेतीन लाख रु पयांपर्यंतचा फायदा मिळणार आहे. पालिका क्षेत्रात दोन ठिकाणी घरांची स्किम उभी राहणार आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर लाभार्थी निवड केली जाणार असून, त्यांना चार पर्याय दिले जाणार आहे. त्यातून लाभार्थ्याने पर्याय निवडून घर घ्यायचे असल्याची माहिती पनवेल महानगर पालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी दिली आहे.२९ गावांतील भाडेकरूंचा होणार सर्व्हेपनवेल महानगरपालिकेत समाविष्ट असलेल्या २९ गावांसह आदिवासी पाड्यांचादेखील या योजनेकरिता सर्व्हे होणार आहे. विशेष म्हणजे गावामधील पक्क्या घरांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच या घरांमध्ये असलेले भाडेकरू ज्यांचे देशात कुठेही घर नसेल त्यांना या योजनेअंतर्गत घर मिळणार आहे. अशा भाडेकरूंची माहिती या सर्व्हेत घेतली जाणार आहे. त्यांचे अ‍ॅग्रीमेंट, रहिवासी पुरावा, प्रतिज्ञापत्र घेऊन बायोमेट्रिक पद्धतीने त्यांची माहिती घेतली जाणार आहे. या योजनेअंतर्गत खोटी माहिती देणाऱ्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे या योजनेतील अधिकारी स्वप्नाली चौधरी यांनी दिली.पंतप्रधान आवास योजेनचा सर्व्हे सुरू झाला आहे. याकरिता संबंधितांनी या सर्व्हेमध्ये नोंदी करून घ्याव्यात. सत्ताधारी भाजपा पदाधिकारी म्हणून आम्ही गरजूंना घर देण्यासाठी कटिबद्ध आहोत- प्रकाश बिनेदार, सभापतीझोपडपट्टी पुनर्वसन समितीनावडे येथील सर्व्हे सुरूसध्याच्या घडीला नावडे येथील झोपडपट्टीचे सर्वेक्षण सुरू आहे. नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याकरिता पुढाकार घेतला आहे. देवधर असोसिएट्सचे अधिकारी टी. कांबळे हे सर्वेक्षणाचे काम पाहत आहेत. अद्याप १०० पेक्षा जास्त झोपडपट्टीधारकांना याठिकाणी अर्ज वाटप केले आहे.