शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झोपडपट्टी पुनर्वसनासाठी चिंचपाडापासून सर्वेक्षण; २१ सप्टेंबरला होणार सुरूवात

By नामदेव मोरे | Updated: September 18, 2023 19:16 IST

एसआरएच्या माध्यमातून कागदपत्रांची होणार पडताळणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईमधील झोपडपट्टीवासीयांना पक्की घरे मिळवून देण्यासाठी शासनाने एसआरए योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी शहरातील झोपडपट्टीवासीयांचे सर्वेक्षण चिंचपाडापासून करण्यात येणार आहे. २१ सप्टेंबरला सर्वेक्षण सुरू केले जाणार असून एसआरए चे कर्मचारी कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत.

          नवी मुंबईमध्ये दिघा ते बेलापूर दरम्यान एमआयडीसीत व डोंगराच्या पायथ्याशी झोपडपट्टी परिसर आहे. झोपडपट्टीमधील नागरिकांना पक्की घरे मिळावीत यासाठी एसआरए योजना राबविण्यात यावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले व पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. या मागणीला शासनाने मंजूरी दिली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. महानगरपालिका क्षेत्रामधील झोपड्यांचे व रहिवाशांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. ऐरोली विभागामधील चिंचपाडा झोपडपट्टीपासून २१ सप्टेंबरला हे सर्वेक्षण सुरू होणार आहे. जानेवारी २००० किंवा त्यापुर्वीपासून संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्यासाठी व प्रत्यक्षात राहणाऱ्या झोपडीवासीयांचा निवारा निश्चीत करण्याचे काम केले जाणार आहे. सर्वेक्षण पथकाकडून झोपडी क्रमांक देण्यात आलेल्या झोपड्यांचे मोजमाप, झोपडीधारकांच्या घरोघरी जाऊन संबंधित कुटुंबप्रमुख यांचे बायोमेट्रीक टेक्नोलॉजीद्वारे अंगठ्याचा ठसा व फोटो व झोपडीसमोर झोपडीधारकांच्या कुटुंबाचे फोटो घेण्यात येणार आहेत. रहिवशांकडून वास्तव्याचे पुरावे संकलीत केले जाणार आहेत. हे सर्वेक्षण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणामार्फत केले जात असून त्यास सहकार्य करण्याचे आवाहन मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण ठाणे १ च्या माध्यमातून केले आहे.

मुंबईच्या धर्तीवर नवी मुंबईमधील झोपडपट्टीधारकांना पक्की घरे मिळावी अशी रहिवाशांची मागणी होती. यासाठी लोकप्रतिनिधींनीही पाठपुरावा केला होता. या मागणीची दखल शासनाने घेतली असून पुढील कार्यवाही सुरू केली आहे. प्रत्यक्षात सर्वेक्षण सुरू होत असल्यामुळे रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील सर्वे झोपडपट्टी परिसराचे सर्वेक्षण केले जाणार आहे.

नवी मुंबईमधील झोपडपट्टी क्षेत्रामध्ये प्रथमच चिंचपाडा येथे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या माध्यमातून बायोमेट्रीक सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. यासाठी सर्व रहिवाशांच्यावतीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आभारी आहोत- विजय चौगुले - शिवसेना जिल्हा प्रमुख नवी मुंबई