शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत प्रचाराचा सुपर संडे, घरोघरी पोहोचण्यासाठी धावपळ: रॅलीसह बैठकांचेही आयोजन

By नामदेव मोरे | Updated: May 12, 2024 18:56 IST

महाविकास आघाडीची सभा, महायुतीची 'मिसळ पे चर्चा'

नवी मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठीचा शेवटचा रविवार असल्यामुळे महाविकास आघाडीसह महायुतीच्या पदाधिकाऱ्यांची मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावपळ सुरू होती. प्रत्येक विभागात रॅली, बैठकांचे आयोजन केले जात होते. घरोघरी पत्रके वाटण्याचे कामही वेगाने सुरू होते.

नवी मुंबईमध्ये ८ लाखापेक्षा जास्त मतदार आहेत. अनेक ठिकाणी पती, पत्नी दोघेही नोकरी, व्यवसायानिमित्त घराबाहेर असतात. रविवार वगळता सर्व सदस्य घरामध्ये नसतात. यामुळे निवडणूक काळात रविवारी जास्तीत जास्त घरापर्यंत पोहचण्यासाठी सर्वपक्षीय कार्यकर्ते प्रयत्न करतात. यावर्षी १२ मे हा प्रचाराचा शेवटचा रविवार असल्यामुळे सकाळपासून दोन्ही प्रमुख उमदेवारांच्या पदाधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. प्रत्येक सोसायटी व घरांमध्ये उमेदवाराचा व त्यांच्या कामाचे परिचय पत्रक पोहचविले जात होते. आतापर्यंत केलेली कामे व भविष्यात केलेल्या कामांचा जाहिरनामाही नागरिकांपर्यंत पोहचविता जात होता. शनिवारी सायंकाळी, रविवारी सकाळी व सायंकाळी नवी मुंबईच्यी १११ प्रभागांमध्ये ठिकठिकाणी रॅलीं आयोजित करून जास्तीत जास्त नागरिकांशी संपर्क साधून मतदानाचे आवाहन केले.

महाविकास आघाडीची सभामहाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी कोपरखैरणे सेक्टर १५ ते १८ च्या मैदानामध्ये सभेचे आयोजन केले आहे. आमदार शशिकांत शिंदे, संग्राम थोपटे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. या परिसरात माथाडी कामगारांची वसाहत असल्यामुळे या सभेचे आयोजन केले होते.

महायुतीची 'मिसळ पे चर्चा'भाजपा युवा मोर्चाचे माजी जिल्हा अध्यक्ष दत्ता घंगाळे यांच्यावतीने सीवूड येथे मिसळ पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विजय नाहटा, निलेश म्हात्रे, नामदेव भगत, महेश खरे, विजय माने यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. या माध्यमातून महायुतीच्या माध्यमातून केलेली कामे व भविष्यात करण्यात येणाऱ्या कामांची माहिती नागरिकांना देण्यात आली.

चौकसभांसह बैठकानेरूळ सेक्टर १८ मध्ये महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी चौक सभेचे आयोजन केले होते. सीवूडमध्ये केरळ व दक्षिणेतील राज्यांमधील नागरिकांची बैठक आयोजिली होती. शहरातील विविध विभागांमध्येही चौकसभा आयोजित केल्या होत्या.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईVotingमतदानElectionनिवडणूक