शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांचा सुपर संडे 

By वैभव गायकर | Updated: March 31, 2024 17:41 IST

निसर्ग पर्यटनासाठी शेकडो पर्यटकांची कर्नाळा अभयारण्याला पसंती 

पनवेल: नजीकच्या काळात निसर्ग पर्यटनाचे महत्व वाढू लागले आहे.विशेषतः सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या मुंबई उपनगरातील नागरिक आवर्जुन नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेटी देत आहेत.यामुळेच पनवेल मधील कर्नाळा अभयारण्यात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.रविवार दि.31 रोजी मोठ्या संख्येने पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्यात हजेरी लावली.

एकीकडे उकाडा वाढत आहे.मार्च महिन्यात त्याची प्रचिती आली.पुढील दोन महिने हा उकाडा कायम राहणार आहे. मार्च महिन्यात  हजारो  पर्यटकांनी कर्नाळा अभयारण्यात भेट दिली.यामुळे अभयारण्य प्रशासनाला लाखोंचा महसूल देखील प्राप्त झाला आहे.स्थानिक महिला बचत गटांना देखील या पर्यटकांमुळे रोजगार प्राप्त होत आहे.मुंबई,पुणे आदींसह राज्यभरातून पर्यटक याठिकाणी येत आहे.अभयारण्य आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला कर्नाळा किल्ला याबाबत कुतूहलाने माहिती घेण्यासाठी पर्यटक येत आहेत.मुंबईपासून 62 कि.मी. अंतरावर असलेले  हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.कर्नाळा येथे निरनिराळया प्रकारचे वृक्ष असून येथे 150 जातींचे पक्षी आढळतात. यात मोर, बुलबुल, दयाळ, भारद्वाज, तितर, गरुड, घार, पोपट, सुतारपक्षी, कोतवाल, बहिरी ससाणा, शहाबाज इत्यादी जातींचे पक्षी आढळतात.कर्नाळा किल्ल्याला देखील मोठा ऐतिहासिक वारसा आहे.याकरिता देखील दुर्ग प्रेमी याठिकाणी येत आहेत.ट्रेकिंग करत कर्नाळा किल्ला सर करण्यासाठी देखील तरुणाईची पाऊले याठिकाणी वळत आहेत. निसर्ग पर्यटनासाठी पर्यटक तसेच गड किल्ले अभ्यासक मोठ्या संख्येने कर्नाळा अभयारण्याला भेट देत आहेत.मार्च महिन्यात हजरो पर्यटकांनी याठिकाणी भेट दिली.-एन डी राठोड (वनक्षेत्रपाल,कर्नाळा अभयारण्य )

टॅग्स :panvelपनवेल