चिरनेर : नवऱ्याच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना उरण तालुक्यातील बोरखार गावात घडली आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव सुगंधा महेश ठाकूर (३६) आहे. सुगंधाला मूल होत नसल्याने तिचा नवरा महेश ठाकूर हा तिचा मानसिक छळ करीत असे. या छळालाच कंटाळून सुगंधाने आत्महत्या केली असल्याचा आरोप सुगंधाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे.सुगंधा आणि महेशचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले होते. मात्र तेव्हापासून त्यांना मूल झाले नसल्यामुळे महेश तिचा शारीरिक व मानसिक छळ करीत असे. तसेच त्याला दुसरे लग्न करता यावे यासाठी तिने घटस्फोट घ्यावा म्हणून तो मारहाण करीत असल्याचा आरोप तिच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. नवऱ्याच्या या जाचालाच कंटाळून सुगंधाने आत्महत्या केली असल्याचे तिच्या नातेवाइकांचे म्हणणे आहे. सुगंधाचा मृतदेह बोरखार गावालगत असलेल्या ताडाची खोशी या खाडीकिनारी झाडाला लटकवलेल्या अवस्थेत मंगळवारी आढळून आला.
नवऱ्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या
By admin | Updated: February 4, 2016 02:40 IST