शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बाळाच्या हृदयावर यशस्वी शस्त्रक्रिया

By admin | Updated: April 12, 2016 01:24 IST

श्रीवर्धनमधील रिक्षाचालकाच्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलाला हृदयाशी संबंधित आजार होता. मात्र नवी मुंबईतील तेरणा सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया

पनवेल : श्रीवर्धनमधील रिक्षाचालकाच्या अवघ्या दोन महिन्यांच्या मुलाला हृदयाशी संबंधित आजार होता. मात्र नवी मुंबईतील तेरणा सह्याद्री रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला नवजीवन दिले. रिक्षाचालक उदेश कार्डेकरच्या पत्नीने वेळेआधीच सातव्या महिन्यात मुलाला जन्म दिला. त्यामुळे बाळ अशक्त व कमी वजनाचे होते. सुरुवातीला बाळावर श्रीवर्धन येथील रुग्णालयात उपचार करण्यात आले. जन्मत: बाळाच्या फुप्फुसाच्या झडपा अरुंद (कोंगेन्टीअल पल्मोनरी वॉल्व स्टेनोसीस) असल्याने डॉक्टरांनी ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला दिला.मात्र रमेशचे उत्पन्न कमी असल्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च परवडण्याजोगा नव्हता. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत उपचार मिळावे यासाठी बाळाला तेरणा सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाचे वय व वजन लक्षात घेता पालकांशी चर्चा केल्यानंतर रुग्णालयातील बालहृदयरोगतज्ज्ञ डॉ. भूषण चव्हाण यांनी एन्जिओग्राफिक बलून उपचार पद्धतीचा मार्ग स्वीकारण्याचे सुचवले. अखेर मार्चअखेरीस बाळावर बलून पल्मोनरी वाल्वोप्लास्टीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करण्यात आली. बाळाच्या पायांच्या नसांतून बलून आत टाकला आणि फुप्फुसाची बंद झडप उघडण्याकरिता तो हृदयापर्यंत नेण्यात आला. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच अशी उपचार प्रक्रि या करण्यात आली. अवघ्या ३० मिनिटांत ही शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात आली. - डॉ. भूषण चव्हाण, तेरणा सह्याद्री रुग्णालय.