शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संचारबंदीमुळे सलग पाच दिवस रुग्णवाढ रोखण्यात यश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:32 IST

रुग्ण बरे होण्याची संख्या वाढली : निर्बंधांमुळे साखळी होते आहे खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : राज्य शासनाने लागू केलेली संचारबंदी व कडक निर्बंध यामुळे नवी मुंंबईमध्ये कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. सलग पाच दिवस रुग्णवाढीपेक्षा रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या ११,०४५ वरून १०,३३७ वर आली आहे.

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. महानगरपालिका प्रशासनाने शहरात संचारबंदी व कडक निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन करणारांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. दहा दिवसांपूर्वी एकाच दिवशी १४०० रुग्ण वाढू लागले होते; परंतु मागील पाच दिवसांमध्ये सातत्याने नवीन रुग्णांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. १५ एप्रिलला १०३६ रुग्ण वाढले होते व १४६५ जण बरे झाले होते. सोमवारी ७५६ नवीन रुग्ण वाढले होते व ९४३ जण बरे झाले होते. पाच दिवसांमध्ये ४६२३ नवीन रुग्ण वाढले व ६०२५ जण बरे झाले आहेत.

महानगरपालिकेला कोरोनाची साखळी खंडित करण्यात यश येऊ लागले आहे. जीवनावश्यक वस्तू वगळून इतर दुकाने बंद ठेवल्यामुळे रोडवरील अनावश्यक गर्दी कमी होऊ लागली आहे. गर्दी करणाऱ्यांवर कारवाई होऊ लागली आहे. या सर्वांचा सकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही नागरिकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन केले आहे. नियमांचे पालन केले तर कोरोनाची साखळी खंडित करणे शक्य होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मृत्यूचा आकडा वाढतोयमागील पाच दिवसांमध्ये नवीन रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले व कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे शहरवासीयांना दिलासा मिळाला आहे; परंतु दुसरीकडे मृत्यूचा आकडा वाढत असल्याचे चिंताही वाढू लागली आहे. पाच दिवसांत ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. प्रतिदिन सरासरी ८ जणांचा मृत्यू होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या