शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सायन-पनवेल महामार्गावरील भुयारी मार्ग बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 23:41 IST

सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती.

नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गावरील नेरु ळ येथे असलेल्या चार भुयारी मार्गांची महापालिकेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून दुरुस्ती करण्यात आली होती. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दुरु स्तीनंतर देखील या भुयारी मार्गांचा गैरवापर होत असल्याने तसेच विविध समस्या उद्भवत असल्याने नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळला होता. अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.सायन-पनवेल महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ असून, महामार्ग ओलांडणाऱ्या नागरिकांची संख्यादेखील मोठी आहे. महामार्ग ओलांडताना अनेक नागरिकांचे अपघात झाले आहेत, त्यामुळे महामार्गाचे रुं दीकरण करताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अपघात टाळण्यासाठी नेरु ळ एलपी येथे २, नेरु ळ एस.बी.आय. कॉलनी आणि उरण फाटा या ठिकाणी प्रत्येकी एक भुयारी मार्ग बनविले होते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने या भुयारी मार्गांचे काम पूर्ण केले नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून ते अर्धवट अवस्थेत होते.अनेक वर्षे पडीक पडल्याने भुयारी मार्गांत सांडपाणी आणि कचरा साचला होता, त्यामुळे या परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले होते. तसेच हे भुयारी मार्ग गर्दुल्ल्यांचा अड्डादेखील बनला होता. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ या अभियानामध्ये महापालिकेच्या वतीने शहरात स्वच्छता मोहीम राबविताना सार्वजनिक बांधकाम विभागाने अर्धवट बांधलेल्या या चारही भुयारी मार्गांची दुरु स्ती करून सदरचे भुयारी मार्ग सुरू केले होते.चारही भुयारी मार्गांची सुधारणा करण्याच्या कामासाठी महापालिकेने तब्ब्ल ४३ लाख रु पयांचा खर्च केला होता. दुरु स्तीनंतर देखील भुयारी मार्गामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झाले असून, मद्यपी आणि जुगार खेळणाऱ्यांनी अड्डा बनविला होता, त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा झाल्याने नागरिकांनी या भुयारी मार्गाचा वापर करणे टाळले होते. पालिका प्रशासनाच्या उदासीनतेमुळे लाखो रु पये खर्च करूनही भुयारी मार्गाच्या अडचणी न सुटल्याने अखेर भुयारी मार्ग बंद करण्यात आले आहेत.>महामार्गावरील भुयारी मार्ग सुरू करण्याची मागणीसायन पनवेल महामार्गावर वाहनांची सतत वर्दळ असते. मार्ग ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी नेरूळ परिसरात लाखो रुपये खूर्चन नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून चार भुयारी मार्ग बांधण्यात आले. मात्र सध्या ते बंदावस्थेत आहेत. भुयारी मार्गाचे अपूर्णावस्थेतील काम पूर्ण करून ते लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.