शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठेकेदारावर गुन्हा दाखल करा

By admin | Updated: July 19, 2014 01:04 IST

महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे सानपाडामध्ये नाल्यातील पाणी रस्त्यावर आले.

नामदेव मोरे, नवी मुंबईमहामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे सानपाडामध्ये नाल्यातील पाणी रस्त्यावर आले. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा असे पत्र महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी तुर्भे व नेरूळ पोलिस स्टेशनला दिले आहे. नवी मुंबईमध्ये १५ जुलैला सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू झाला होता. यावेळी औद्योगिक वसाहतीमधून येणाऱ्या नाल्याचे पाणी हर्डीलीया कंपनीजवळ रस्त्यावर आले होते. यामुळे सायन - पनवेल महामार्गावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. रात्री २ वाजेपर्यंत चक्काजाम झाले होते. याठिकाणी महामार्ग रूंदीकरण करणाऱ्या ठेकेदाराने नाल्याचे पाणी वाहून जाण्यासाठी कल्वर्ट तयार केले. परंतू शेवटच्या लेनच्या खाली कल्वर्ट ऐवजी पाईप टाकले होते. पाईपमध्ये गाळ साचल्याने सर्व पाणी रस्त्यावर आले. येथील लक्ष्मीवाडी झोपडपट्टीमध्ये पाणी शिरले, हर्डीलीया कंपनीची भिंत कोसळली. अखेर ठेकेदार व महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्याची एक लेन जेसीबीने तोडली. पाईप बाहेर काढून नाल्यास मोकळी वाट करून दिली. ठेकेदाराने केलेल्या चुकांमुळे हा प्रकार घडल्याचा अभिप्राय पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे.