शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससी परीक्षेसाठी संधीचे बंधन असल्याने विद्यार्थी नाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:48 IST

उमेदवारांसाठी संधीची कमाल मर्यादा निश्चित; काहींनी केले निर्णयाचे स्वागत

योगेश पिंगळे

नवी मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा देण्यासाठी आता संधीची मर्यादा नक्की केली आहे. संधीची संख्या कमी झाल्याने, अनेक विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे. संधी कमी झाल्याने, या ठरावीक संधींचे सोने करण्याची वेळ असल्याचे मत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केले आहे. 

यापूर्वी अनेक विद्यार्थी नोकरी मिळाल्यानंतरही वयाची अट संपेपर्यंत परीक्षा द्यायचे. मात्र, आयोगाने बंधन आणल्याने विद्यार्थ्यांना सहा, मागास वर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांना नऊ संधीचे बंधन घातले आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधींमध्ये वाहद करण्यात यावीत, तसेच मुलींसाठी मोफत शैक्षणिक साहित्याचीही सुविधा असावी, असे मत परीक्षार्थी मुलींनी यक्त केले आहे. नेरुळमधील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ठाणे जिल्हा येथील ग्रंथालयात एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या काही विद्यार्थ्यांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असून, काहींनी या  निर्णयाचे  स्वागत केले आहे.

अशा प्रकारे होईल संधीची गणना एखाद्याने एमपीएससीच्या पूर्व परीक्षेत भाग घेतल्यास ही संबंधित परीक्षेची संधी समजली जाईल. एखादा उमेदवार पूर्व परीक्षेच्या कोणत्याही एक पेपरसाठी उपस्थित राहिल्यास त्याची ती संधी समजली जाईल. परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवार कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरल्यास किंवा त्याची उमेदवारी रद्द झाल्यास ती परीक्षेची उपस्थिती समजली जाईल.

मुलींच्या संधीमध्ये वाढ करावीअनेक मुलींना शिक्षणाची आवड असते, परंतु ठरावीक वयानंतर त्यांच्या लग्नाचा विचार केला जातो. लग्नानंतर त्यातील काही मुलींना शिक्षणाची संधी मिळते, परंतु संधीच्या बंधनामुळे त्या मुलींचे स्वप्न अर्धवट राहण्याची शक्यता आहे. मुलींना देण्यात येणाऱ्या संधीमध्ये वाढ करणे गरजेचे आहे.                                                     - निलू पांडे , उमेदवार

दुसरा मार्ग अवलंबता येईलहा निर्णय विद्यार्थ्यांनी सकारात्मक घेतला, तर योग्यच आहे. यामुळे जोपर्यंत विद्यार्थ्यांची तयारी होत नाही, तोपर्यंत विद्यार्थी परीक्षेला बसणार नाहीत किंवा त्यांना योग्य वयातच दुसरा काही मार्ग अवलंबता येऊ शकतो.    - सुशांत कोळेकर, उमेदवार

वेळ वाया जाणार नाहीपरीक्षेला संधींची मर्यादा असल्याने ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास झाला आहे, असेच विद्यार्थी परीक्षेला सामोरे जातील. यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ वाया जाणार नाही आणि त्यांना करिअरसंदर्भात वेळीच योग्य निर्णय घेता येईल.    - आकाश शिंदे, उमेदवार

निर्णय अतिशय योग्य संधीचे सर्वांना समान बंधन असायला पाहिजे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना खरोखर भविष्य घडवायचे आहे, ते त्या वेळेत सीरियसली अभ्यास करतील, त्यामुळे हा निर्णय योग्य आहे. त्याचा फायदा विद्यार्र्थ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे होणार आहे.                                            - तुषार येचकर , उमेदवार

 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMPSC examएमपीएससी परीक्षा