शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
4
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
5
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
6
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
7
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
8
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
9
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
10
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
11
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
12
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
13
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
14
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
15
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
16
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
17
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
18
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
19
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
20
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!

नेरळ गावातील विद्यार्थी दाटीवाटीत घेताहेत शिक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 01:21 IST

कुंभारआळी शाळेची इमारत पाडून तीन वर्षे पूर्ण

कांता हाबळे 

नेरळ : नेरळ गावातील रायगड जिल्हा परिषदेच्या कुंभारआळी भागातील शाळेच्या इमारती नवीन इमारत बांधण्यासाठी पाडण्यात आल्या आहेत. मात्र, त्या गोष्टीला तीन वर्षे पूर्ण झाली असून अद्याप त्या वर्गखोल्यांच्या बांधकामाबाबत कोणतीही ठोस माहिती नाही. दरम्यान, इमारत उपलब्ध नसल्याने त्या शाळेचे विद्यार्थी एकाच इमारतीमध्ये दाटीवाटीने बसून शिक्षण घेत आहेत.

नेरळ गावातील कुंभारआळी येथे असलेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेच्या तीन इमारती त्या ठिकाणी होत्या. त्या कौलारू इमारतीमध्ये पाच वर्ग आणि षट्कोनी इमारतीमध्ये एक, असे वर्ग त्या शाळेत भरविले जात होते. त्या सर्व इमारती २०१६ मध्ये जिल्हा परिषदेने पाडल्या असून, त्या जागी नवीन इमारती उभ्या करण्याची कार्यवाही अद्याप सुरू झालेली नाही.ज्या वेळी इमारती पाडण्यात आल्या, त्या वेळी त्या ठिकाणी १२ वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या. मात्र, त्या वर्गखोल्यांना मंजुरी होती का? जिल्हा परिषदेच्या परवानगीने इमारती पाडण्यात आल्या होत्या का? याबाबत उपोषणदेखील झाले होते आणि जिल्हा परिषदेने एक समिती गठीत केली होती. त्या समितीचे काय झाले आणि परवानगीचे काय झाले, याबाबत नेरळ ग्रामस्थांना काहीही देणे घेणे नाही. फक्त नेरळ ग्रामस्थांना शाळेची इमारत पाहिजे, अशी भूमिका नेरळचे उपसरपंच अंकुश शेळके यांनी घेतली होती. मात्र, आजतागत नेरळ कुंभारआळी भागातील शाळेची इमारत उभी राहू शकली नाही.मात्र, इमारत तोडून तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी नवीन इमारतीचे कोणत्याही प्रकारचे बांधकाम जिल्हा परिषदेकडून करण्यात आले नाही. त्यामुळे नेरळ गावातील कुंभारआळी शाळेत जाणारे विद्यार्थी हे बाजूच्या शाळेत दाटीवाटीने बसत आहेत. त्या ठिकाणी असलेल्या उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांचे स्थलांतर करून त्या इमारतीत कुंभारआळी शाळेतील विद्यार्थी बसत आहेत. तर २०१६ मध्ये पाडण्यात आलेल्या तीन इमारतींतील काही वर्गखोल्यात अंगणवाड्या भरवल्या जायच्या. त्या अंगणवाड्या सध्या शिवाजी महाराज मैदानात भरवल्या जात आहेत. ही स्थिती लक्षात घेऊन विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी नवीन वर्गखोल्या बांधण्याची कार्यवाही जिल्हा परिषदेकडून होण्याची आवश्यकता आहे; परंतु गेल्या तीन वर्षात भूमिपूजन झालेल्या इमारतीचे बांधकाम अद्याप होऊ शकले नाही, याचे आश्चर्य नेरळकरांना वाटत आहे. त्यामुळे १२ वर्गखोल्यांची दुमजली इमारत होण्याचे काम होईल तेव्हा होईल; पण पूर्वी ज्या सहा वर्गखोल्या कुंभारआळी शाळेच्या आवारात होत्या, त्या तर बांधून द्याव्यात, अशी मागणी स्थानिक करीत आहेत.कुंभारआळी शाळेची इमारत पाडली, तेव्हा नवीन किती वर्गखोल्या बांधण्यात येणार होत्या, याबद्दल काही माहिती नाही; पण आपण त्या जागेवर सहा वर्गखोल्या बांधण्याचे काम मंजूर करून घेतले आहे.- अनसूया पादिर, सदस्या,रायगड जिल्हा परिषदनेरळ कुंभारआळी शाळेचा विषय हा चौकशीच्या फेऱ्यात असून, जिल्हा परिषद स्वतंत्र चौकशी करीत आहे. त्यामुळे आपल्याला त्याबाबत काहीही अधिक सांगता येणार नाही.- सुरेखा हिरवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी, कर्जत 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई