शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

कंटेनर फोडणाऱ्या टोळीला अटक

By admin | Updated: March 2, 2016 02:22 IST

कंटेनर फोडून मालाची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:ची बनावट ओळख तयार करून अथवा चालकाच्या मदतीने प्रवासादरम्यान

नवी मुंबई : कंटेनर फोडून मालाची चोरी करणाऱ्या दोन टोळ्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. स्वत:ची बनावट ओळख तयार करून अथवा चालकाच्या मदतीने प्रवासादरम्यान ते कंटेनरमधून मालाची चोरी करायचे. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.पनवेल, तळोजा, उरण व जेएनपीटी परिसरात कंटेनर चोरीच्या अथवा त्यामधील माल चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. या गुन्ह्याला आळा घालत सक्रिय टोळ्यांचा शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा पोलिसांनी तपासकार्यावर अधिक भर दिला होता. यादरम्यान दोन टोळ्या पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. एक टोळी चोरीचा मुद्देमाल घेवून तळोजा परिसरात येणार असल्याची माहिती मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कोकणी, हवालदार संजय पवार, किरण राऊत, अनिल यादव, दिलीप भास्करे, मेघनाथ पाटील यांच्या पथकाने खुटारी गावालगत सापळा रचला होता. वाहनांची झाडाझडती सुरू असताना सुती धाग्याचे बंडल असलेला डम्पर (एमएच ४६ एफ २७००) पोलिसांना संशयित आढळून आला. चौकशीत डम्परमधील माल चोरीचा असल्याचे समोर आले. यानुसार डम्परमधील दिलीप बिकटे, अमनसिंग सिंग, रियाज शेख यांना अटक करण्यात आली. हा माल नवकार कंपनीतून बांगलादेश येथे निर्यात करण्यासाठी कंटेनरमधून जेएनपीटीला पाठवण्यात आला होता. परंतु प्रवासात कंटेनर फोडून सुती धाग्याचे बंडल चोरीला गेले होते. अमनसिंग हा बनावट कागदपत्राच्या आधारे स्वत:ची खोटी ओळख तयार करून कंपनीत नोकरी मिळवायचा. आणि संधी साधून जबाबदारी सोपवलेला कंटेनर चोरी करायचा.याचदरम्यान १९ लाख ५१ हजार रुपये किमतीचा फेरोक्रोम हाय कार्बन स्टीलसाठी लागणारा कच्चा माल चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती. या गुन्ह्यातील कंटेनर चालक समीर खान ऊर्फ मोहम्मद हा कारवाईच्या भीतीने पोलिसांना शरण आला होता. तसेच चौकशीत त्याने पोलिसांना मुख्य आरोपींची माहिती दिलेली. यानुसार रमजान अन्सार (२५) व आलम अन्सारी (२८) या दोघांना भिवंडी येथून अटक केली असून त्यांच्या फरार साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांनी समीर खान याचे बनावट ड्रायव्हिंग लायसन्स बनवून त्याला एका कंपनीत कामाला लावले होते. यानुसार समीर मालाचा कंटेनर घेवून जात असताना कंटेनर चोरी करून दिल्लीला नेला. तसेच समीर याला धमकावून सोबत नेले होते. परंतु त्यांच्या तावडीतून सुटताच समीरने नवी मुंबई गुन्हे शाखेशी संपर्क साधून संपूर्ण प्रकाराची माहिती दिली. (प्रतिनिधी)