शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामस्थांचा स्थलांतरास ठाम विरोध

By admin | Updated: May 23, 2016 03:09 IST

भूगर्भ शास्त्रज्ज्ञांच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३४ गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे

महाड : भूगर्भ शास्त्रज्ज्ञांच्या अहवालानुसार महाड तालुक्यातील ३४ गावांना दरडी कोसळण्याचा धोका संभवत असल्याचे सांगण्यात आले आहे. या अहवालामुळे महसूल विभाग खडबडून जागा झाला असून ३४ गावातील दरडीचा धोका टाळण्यासाठी या दरडप्रवण गावातील दोन हजार ५० कुटुंबातील नऊ हजार ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना महसूल विभागामार्फत देण्यात आलेल्या आहेत. मात्र या गावातील बहुतांश कुटुंबांनी स्थलांतर करण्यास ठाम विरोध दर्शवला आहे. आधी पुनर्वसन करा मगच त्या ठिकाणी आमचे स्थलांतर करु अशी भूमिका या दरडप्रवण गावातील ग्रामस्थांनी घेतल्याने महसूल विभागापुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.महसूल विभागाला आपली खरोखरच काळजी वाटते मग केवळ पावसाळ्यापूर्वीच हे स्थलांतराचे सोपस्कार का केले जातात, असा सवालही हे ग्रामस्थ व्यक्त करताना दिसून येत आहेत. मुळात महाड तालुक्यातील गावे डोंगरालगत आहे. २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जुई, कोंडीवते, दासगाव, रोहन या गावावर दरडी कोसळून शेकडो जणांचे बळी गेले तर असंख्य कुटुंबे बेघर झाली. या दरडग्रस्त बेघर कुटुंबांचे दासगाव वगळता सर्व ठिकाणचे पुनर्वसन प्राईड इंडिया, लालबागचा राजा ट्रस्ट, जनकल्याण ट्रस्ट या सेवाभावी संस्थांमार्फत करण्यातही आले. या पार्श्वभूमीवर यंदा नेहमीपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिल्यामुळे महसूल विभागामार्फत उपाययोजना केली जात आहे. त्या दृष्टीने दरडीचा धोका टाळण्यासाठी दरडप्रवण ३४ गावातील ग्रामस्थांनी अन्यत्र स्थलांतर करावे जर ही कुटुंबे स्थलांतरित झाली नाहीत तर त्या कुटुंबाचे जबरदस्तीने स्थलांतर करण्याचा इशारा महसूल विभागातर्फे दिला आहे२००५ पासून आम्हाला स्थलांतर करण्याच्या सूचना शासन देते, मात्र गेली ११ वर्षे शासनाने याबाबत कुठलीही उपाययोजना केली नसल्याचे हे ग्रामस्थ संतप्त होवून सांगत आहेत. (वार्ताहर)