शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

कचऱ्यातून वीजनिर्मितीला तीव्र विरोध

By admin | Updated: March 4, 2016 02:00 IST

विरोधकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या बळावर कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या १८० कोटी रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

नवी मुंबई : विरोधकांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादी काँगे्रसने बहुमताच्या बळावर कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या १८० कोटी रूपयांच्या प्रस्तावास मंजुरी दिली. परंतु आघाडीमधील काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांनीही विरोध दर्शवून आंदोलनाचा इशारा देऊन विरोधी पक्षाची कमतरता भरून काढली. कचऱ्यातून मिथेन निर्मितीचा प्रकल्प फसल्यानंतर आता महापालिकेने कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा १८० कोटी रूपयांचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेमध्ये मंजुरीसाठी मांडला होता. शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी सभात्याग केला असल्यामुळे प्रस्ताव सहज मंजूर होईल असे वाटत असताना सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीच प्रस्तावाला आक्षेप घेतल्याने हा प्रस्ताव पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पालिकेने डंपिंग ग्राऊंडवरील कचऱ्यावर प्रक्रिया करून खतनिर्मिती व फ्यूएल पॅलेट्स तयार करण्याचा ठेका खाजगी कंपनीला दिला आहे. परंतु खत व फ्युएलला मागणी नसल्याने संबंधितांना तोटा सहन करावा लागत आहे. त्यांचा तोटा भरून काढण्यासाठी कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव तयार केला. ६०० ते १२०० टन प्रतिदिन क्षमतेचा घनकचऱ्यापासून विद्युत निर्मिती केली जाणार असून ती महावितरणला विकली जाणार आहे. यासाठी १८० कोटी रूपये खर्च होणार आहेत. काँगे्रस नगरसेविका मंदाकिनी म्हात्रे यांनी तीव्र आक्षेप घेतले. मोरबे धरणावरील १७० कोटी रूपयांचा सौरऊर्जा प्रकल्प ठप्प झाला आहे. कचऱ्यातून वीजनिर्मिती करून ती ७.९० रूपये प्रतियुनिट दराने महावितरणला विकली जाणार आहे. परंतु महावितरणच्या स्वत:च्या वीजनिर्मितीचा दर ४.५९ व सौरउर्जेतून वीजनिर्मितीचा दर ७.४ रूपये असताना पालिकेची वीज ७ रूपये दराने कशी विकत घेतली जाणार? ठेकेदाराच्या हितासाठी पालिकेचे पैसे फुकट घालवले जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या सुरेश कुलकर्णी यांनी हा प्रस्ताव मंजूर केला तर तुर्भे स्टोअर परिसरातील २ लाख नागरिक आंदोलन करतील असा इशारा दिला. पालिका देशभरातून आलेल्या शिष्टमंडळाला डंपिंग ग्राऊंड दाखवून ५०० मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे सांगत आहे. येथील डंपिंग ग्राऊंडची क्षमता संपत आली असताना तिथे वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याचा डाव आहे. आम्ही हा डाव उधळून लावणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांनीच विरोध दर्शविल्यामुळे वीजनिर्मितीचा प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. (प्रतिनिधी)> कचऱ्यातून वीजनिर्मिती करण्याच्या प्रस्तावासाठी १८० कोटी रूपये खर्च होणार आहे. महापालिका पैसे नसल्याचे कारण सांगून ऐरोलीतील नाट्यगृहासह अनेक प्रकल्प धीम्या गतीने करत आहे. कोणताही मोठा प्रकल्प सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वीचे वीजनिर्मितीचे सर्व प्रकल्प फसले असताना पुन्हा जनतेने कररुपाने दिलेल्या पैशाची उधळपट्टी करू नये अशी भूमिका नागरिकांनी व्यक्त केली आहे. डंपिंगमधील आगही संशयास्पद१डंपिंग ग्राऊंडला १ मार्चला आग लागली होती. दिवाळीनंतरची ही दुसरी घटना. वास्तविक डंपिंग ग्राऊंडमध्ये तेथील रोजच्या कर्मचाऱ्यांऐवजी दुसऱ्या कोणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. जिथे आग लागली तिथे बाहेरून कशामुळे आग लागणे शक्यच नाही. २दिवाळीमध्ये फटाक्यामुळे आग लागली असे सांगण्यात आले. पण आता काहीच कारण नसताना आग लागलीच कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आग लावली असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या आगीची चौकशी करण्याची मागणी होवू लागली आहे.