शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात कडक कारवाई

By admin | Updated: November 22, 2015 00:45 IST

शहरात उभारल्या जाणाऱ्या विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यानुसार होर्डिंग्ज लावणाऱ्यांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात

नवी मुंबई : शहरात उभारल्या जाणाऱ्या विनापरवाना होर्डिंग्जच्या विरोधात महापालिकेने आता कंबर कसली आहे. त्यानुसार होर्डिंग्ज लावणाऱ्यांच्या विरोधात थेट फौजदारी कारवाई करण्यात येत आहे. याअंतर्गत आतापर्यंत सात जणांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. इतकेच नव्हे, तर बेकायदा होर्डिंग्जकडे डोळेझाक करणाऱ्या संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांवरसुद्धा कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या होर्डिंग्ज संस्कृतीला प्रतिबंध घालण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. असे असले तरी कारवाईदरम्यान होणाऱ्या राजकीय हस्तक्षेपामुळे अतिक्रमण विभागाला मर्यादा पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून, अतिक्रमणे व बेकायदा होर्डिंग्जला आळा घालण्यासाठी साहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची नेमणूक केली आहे. त्यानुसार डॉ. कैलास गायकवाड यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारताच डॉ. गायकवाड यांनी अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेकायदा होर्डिंग्जच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत गेल्या तीन दिवसांत विनापरवाना होर्डिंग्ज लावणाऱ्या सात जणांच्या विरोधात शहर विद्रुपीकरण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आगामी काळात ही कारवाई अधिक तीव्र करण्याचे संकेत संबंधित विभागाकडून देण्यात आले आहे. न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित वॉर्ड अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सकाळी व संध्याकाळी असे दोन वेळा फिरत्या पथकांच्या माध्यमातून शहरातील होर्डिंग्जचा आढावा घेतला जाणार आहे. होर्डिंग्ज व जाहिरात फलक आढळून आल्यास ते तत्काळ काढून टाकले जाणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व प्रक्रियेत हलगर्जीपणा करणाऱ्या वॉर्ड अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल, असे डॉ. गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.