शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण नियमांना हरताळ

By admin | Updated: April 21, 2016 02:58 IST

यादवनगरबरोबर शहरातील बहुतांश सर्व नोडमध्ये परप्रांतीयांनी अनधिकृत तबेले सुरू केले आहेत. सद्य:स्थितीमध्ये तब्बल ९८ अनधिकृत तबेले असून त्यामध्ये २१२० जनावरे आहे.

नामदेव मोरे, नवी मुंबई यादवनगरबरोबर शहरातील बहुतांश सर्व नोडमध्ये परप्रांतीयांनी अनधिकृत तबेले सुरू केले आहेत. सद्य:स्थितीमध्ये तब्बल ९८ अनधिकृत तबेले असून त्यामध्ये २१२० जनावरे आहे. पर्यावरणाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन करून बिनधास्तपणे व्यवसाय सुरू असूनही प्रशासन कोणावरच कारवाई करत नाही. कायद्यात तरतूद असतानाही अद्याप कोणावरच गुन्हा दाखल झाला नाही. आगरी - कोळी भूमिपुत्रांची शंभर टक्के जमीन शासनाने संपादित केली. या जमिनीवर ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत व नवी मुंबई हे सुनियोजित शहर वसविण्यात आले. भूमिपुत्रांना एक इंच जमीनही शासनाने फुकट दिली नाही. परंतु दुसरीकडे उत्तरप्रदेश, बिहारमधून आलेल्या परप्रांतीयांनी शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण करून स्वत:चे साम्राज्य निर्माण केले जात आहे. गरजेपोटी घरे बांधणाऱ्या भूमिपुत्रांना भूमाफिया ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. परंतु मतांच्या राजकारणासाठी परप्रांतीयांना अभय दिले जात आहे. ‘लोकमत’ने याविषयी आवाज उठविताच प्रशासनही खडबडून जागे होवू लागले आहे. फक्त यादवनगर परिसरात ५० एकरपेक्षा जास्त जमिनीवर अतिक्रमण झाले आहे. एकाच प्रभागात २० पेक्षा जास्त तबेले अनधिकृतपणे सुरू आहेत. पूर्ण महापालिका कार्यक्षेत्रामध्ये एकूण ९८ तबेले आहेत. यामधील ९४ पूर्णपणे अनधिकृत आहेत. तुर्भेमधील चार तबेल्यांसाठी परवानगी घेतली असली तरी तेथेही पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आले आहेत. यामुळे शहरातील सर्वच तबेले अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या तबेल्यांमध्ये तब्बल २१२० जनावरे आहेत. शहरामध्ये तबेला सुरू करण्यासाठी पर्यावरण विभाग व दुग्ध विकास अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. परंतु परवानगी घेतली जात नाही. जे परवानगी घेतात ते पर्यावरणाच्या सर्वच नियमांचे उल्लंघन करत आहेत. शासनाने महाराष्ट्र नागरी क्षेत्रामध्ये गुरे पाळणे व त्यांची ने आण करण्यासाठी १९७६ मध्ये कायदा तयार केला आहे. तबेल्यांना परवानगी देण्यासाठी जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी यांची नियुक्ती केली आहे. पर्यावरण विभागानेही वेळोवेळी नियम तयार केले आहेत. परंतु यामधील कोणत्याच नियमांचे पालन होत नाही. तबेला तयार करताना जनावरांसाठी पुरेसी जागा असणे आवश्यक आहे. काँक्रीट किंवा लादी टाकून योग्य स्लोप करण्यात यावा, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु नवी मुंबईमध्ये परप्रांतीयांच्या बेकायदेशीर तबेल्यावर कोणतीच कारवाई केली जात नाही. बेकायदेशीर व्यवसायास राजकीय व प्रशासकीय आश्रय मिळू लागला आहे.